आ. अनिल पाटील यांचे प्रशासकीय इमारतीचे आंदोलन चिघळले ! ! ! विविध सामाजिक संघटना व संस्थांचा पाठींबा • • • - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

09/06/2023

आ. अनिल पाटील यांचे प्रशासकीय इमारतीचे आंदोलन चिघळले ! ! ! विविध सामाजिक संघटना व संस्थांचा पाठींबा • • •

अमळनेर (प्रतिनिधी) : - -
        आ. अनिल पाटील यांचे प्रशासकीय इमारतीचे आंदोलन चिघळले  ! ! ! विविध सामाजिक संघटना व संस्थांचा पाठींबा  •  •  •
        अमळनेर येथील महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. विविध पक्ष , सामाजिक संघटना व संस्थांचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे. 
        जुन्या पोलीस कवायत मैदानावर प्रशासकीय इमारतमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. बसस्थानक पासुन जवळच विविध कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने कामे होऊन शेतकरी बाजार करून सहज परत जाऊ शकतील. बाहेरून येणाऱ्यांसाठी देखील सोयीचे होणार आहे.
         प्रशासन इमारत गावाबाहेर 5 ते 6 किमी अंतरावर हलविण्याची घाट घातला जात आहे. यामुळे जनतेचे हाल होणार आहेत.  इमारत पोलीस कवायत मैदानाच्या ठिकाणीच व्हावी आणि पोलीस विभागा कडून जागा खाली करून काम लवकर सुरू व्हावे म्हणून बाजार समिती सभापती अशोक पाटील , संचालक समाधान धनगर व विजय पाटील यांनी संचालक व तालुक्यातील शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.
         त्याचप्रमाणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील , महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ , शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील , खाटीक समाजाचे अध्यक्ष मुक्तार अख्तर खाटीक , मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील , उपाध्यक्ष संजय पाटील , सचिव विक्रांत पाटील , एस एम पाटील , गौरव पाटील , कैलास पाटील ,विलास पाटील , जेष्ठ नागरिक संघाचे श्रावण पाटील , कृष्णा पाटील , प्रभाकर पाटील अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत , उपाध्यक्ष जितेंद्र ठाकुर तसेच पांडुरंग पाटील , संजय पाटील , किरण पाटील , मुन्ना शेख , आर जे पाटील , महेंद्र रामोसे , मिलिंद पाटील , राहुल बहिरम , विनोद कदम , रवी मोरे , श्यामकांत पाटील , दिनेश पालवे , आबिद शेख , गणेश भामरे , काशिनाथ चौधरी यांनीही सक्रिय पाठिंबा दिला असून 12 जून रोजी जळगाव येथे होणाऱ्या आंदोलनात अनेक जण सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp