चोपडा तालुका व्यापारी महामंडळाची नूतन कार्यकारणी पुढील 3 वर्षांसाठी बिनविरोध निवड - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/07/2023

चोपडा तालुका व्यापारी महामंडळाची नूतन कार्यकारणी पुढील 3 वर्षांसाठी बिनविरोध निवड

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          चोपडा तालुका व्यापारी महामंडळाची नूतन कार्यकारणी पुढील 3 वर्षांसाठी बिनविरोध निवड
         चोपडा येथिल व्यापारी महामंडळाची अनिल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली तर संजय कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी तीन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. 
           सविस्तर असे की, येथिल व्यापारी महामंडळाची नुतन कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून अमृतराज सचदेव, कार्यकारी अध्यक्ष - सुनील बरडिया, प्रमुख मार्गदर्शक -अनिल वानखेडे, संजय कानडे, जीवन चौधरी, भूपेंद्र गुजराथी, सुनील बुरड, संजय श्रावगी, उपाध्यक्ष - दिपक राखेचा, नरेंद्र तोतला, शाम सोनार, प्रफुल्ल स्वामी, उमेश कासट, कायदेशीर सल्लागार - ऍड. धर्मेंद्र सोनार, सचिव - प्रविण राखेचा, सहसचिव - विपीन जैन, तर जवळपास 74 व्यापाऱ्याची संचालक म्हणून निवड बिनविरोध झाली असून प्रसिद्ध प्रमुख म्हणून प्रवीण पाटील, लतीश जैन, मिलिंद सोनवणे आदींची एक मुखाने निवड झाली आहे. यावेळी अनेक व्यापारी हजर होते नवीन निवड झालेल्या व्यापारी बंधुचे सर्वत्र कौतुक होत आहे.
          नुतन अध्यक्ष अमृतराज सचदेव म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून मी ही जबाबदारी व्यवस्थित आपल्या सर्वांच्या सहकार्य मुळे सांभाळत आलो आहे आता ह्या जबाबदारीतुन मला मुक्त करावे असे मी सुचविले होते परंतु आगामी 3 वर्षांसाठी अजून सर्व व्यापाऱ्यानी माझ्यावर भार टाकला आहे. तो मी तुमच्या सहकार्य मुळे समर्थ पणे सांभाळेल असे आश्वासन देतो आणि आपल्याच सहकार्याने सर्वांना माझ्याने होईल तितकी मदत करण्याचे प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले.
           व्यापारी महामंडळात सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे लोक असून देखील चोपड्यात व्यापाऱ्यांचा एकोपा आणि एकमेकांना मदत करण्याची भूमिका असल्यानेच माझ्या सारख्या छोट्या व्यक्तीला आपण जवळपास 25 वर्षांपासून अध्यक्ष म्हणून राहू देत आहे हे माझ्या साठी मोठी अभिमानाची बाब आहे. असेही सचदेव म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp