व्यापार वाढीसाठी ऑनलाइन बिजनेस करा पण लोकांनी ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी थांबवा --- माजी आ. मनीषदादा जैन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/07/2023

व्यापार वाढीसाठी ऑनलाइन बिजनेस करा पण लोकांनी ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी थांबवा --- माजी आ. मनीषदादा जैन

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           व्यापार वाढीसाठी ऑनलाइन बिजनेस करा पण लोकांनी ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी थांबवा --- माजी आ. मनीषदादा जैन
          आजच्या तारखेत व्यापारी हा सर्वांच्या नजरेत चोर झाला आहे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी आला की तो व्यापाऱ्याला चोरच समजतो परंतु व्यापाऱ्याला शासनाच्या कित्येक अधिकाऱ्यांना तोंड देत आपला व्यापार सुरळीत करायचा असतो तो त्याच्या परिवाराला देखील पूर्ण वेळ देऊ शकत नाही
          ते पुढे म्हणाले की, सकाळी सहा पासून तर रात्री दहापर्यंत तो मेहनतच करत राहतो या जगात सर्वात जास्त मेहनती शेतकरी असून तदनंतर मात्र व्यापाऱ्यांच्या लागतो परंतु शासनाच्या कोणत्याही अधिकारी आला तरी त्याला चोर समजूनच वागणूक मिळत असते अशा याच्यात लहान व्यापारी टिकणे कठीण झाले आहे त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याने आधुनिकते कडे वळावे व आपणही ऑनलाइन बिजनेस करू शकता तंत्रज्ञानाचे जोड घेऊन आपण सोशल मीडियावर आपल्याकडच्या चांगल्या वस्तू आणि कमी दरात अपलोड करू शकता ऑनलाइन बिजनेस हा वाईट नसून त्यापेक्षा ब्रॅण्डेड वस्तू घेण्यावर नियंत्रण आणले तर भारतातला पैसा हा भारतातच राहील असे प्रखड मत माजी आमदार व उद्योगपती मनीष दादा जैन मांडले काल दिनांक 26 रोजी संस्कार मंडपम् मध्ये झालेल्या व्यापारी महामंडळाच्या पदग्रहण सोहळा व अध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्या वाढदिवसा निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
          यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे चेअरमन ऍड.संदिप पाटिल, माजी आ. गुरुमुख जगवाणी, उद्योजक वसंतकाका गुजराथी, मा.आ.कैलास पाटील, डॉ विकास हरताळकर, पो. नि. के.के पाटिल, ग्रामीण पो.नि. कावेरी कमलाकर, निवृत्त पो नि. श्यामकांत सोमवंशी, जीएसटीचे प्रधान सचिव जगजीवन सुखदेव, महावीर पतसंस्थाचे संस्थापक चेअरमन शांतीलाल बोथरा,जैन समाजाचे मा.संघपती माणकलाल चोपडा, व्यापारी महामंडळाचे मा.अध्यक्ष विजयकुमार अग्रवाल, वरिष्ठ सलाहकार चंदुलाल पालीवाल, महावीर पतसंस्थाचे नवनिर्वाचित संचालक राजाराम पाटिल आदी उपस्थित होते. 
         यावेळी ऍड.संदीप पाटील, गुरुमुख जगवाणी, शिवसेना शहर प्रमुख आबा देशमुख, आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवराचे सत्कार चोपडा व्यापारी महामंडाळाच्या पदाधिकारयांनी केले यावेळी प्रास्ताविक अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर नेवे,आदेश बरडिया, दिपक राखेचा यांनी केले. अमृतराज सचदेव यांच्या वाढदिवसानिमित्त 11 किलोचा केक लहान मुलांच्या हस्ते कट करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो व्यापारी मंडळी हजर होती.
           कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील बरडिया, अनिल वानखेडे, संजय कानडे, शाम सोनार, प्रफुल्ल स्वामी, अजय कानडे, प्रविण राखेचा, लतीश जैन, विपीन जैन, सनी सचदेव, पियुष जैस्वाल, सनम जैन, सिद्धार्थ पालिवाल, तेजस जैन, बापू महाजन, आदिंनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp