स्वतःमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना जोपासा ... हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.हेमंत पाटील यांचे प्रतिपादन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

05/08/2023

स्वतःमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना जोपासा ... हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.हेमंत पाटील यांचे प्रतिपादन....


 जळगाव (प्रतिनिधी) : - -

          स्वतःमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना जोपासा ... हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.हेमंत पाटील यांचे प्रतिपादन....

          जळगांव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम.जे.कॉलेज जळगाव येथे नुकतेच हास्यजत्राफेम व मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख, सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.श्री.हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात समई प्रज्वलनाने झाली.

         याप्रसंगी प्रा.श्री.हेमंत पाटील सरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून त्यांनी कलाविश्व व अभिनय क्षेत्रातील संधी यावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले व ज्यांना नाट्यशास्त्रामध्ये अभिरुची आहे त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.


         त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले की, शैक्षणिक सिद्धता व कला जोपासणूक ही समांतर झाली पाहिजे. कलेची उपासना करताना समर्पित वृत्ती हवी. संघर्षाविना, प्रामाणिकपणा शिवाय कोणतेही यश मिळत नाही. यश मिळाल्यावर कायम मातीशी इमान राखा, ज्ञान मिळवा, संघर्ष करा व स्वतःला सिद्ध करा हाच जीवनाचा मूलमंत्र आहे.

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.श्रीमती करुणा सपकाळे, प्रमुख उपस्थिती म्हणून  महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आर. बी. ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.सौ. स्वाती ब-हाटे, प्रा.उमेश पाटील व प्रा.प्रसाद देसाई व कला मंडळाचे अध्यक्ष प्रा. योगेश धनगर होते.

          या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिपक चौधरी, प्रास्ताविक कला मंडळाचे अध्यक्ष प्रा. योगेश धनगर, प्रमुख उद्घाटकांचा परिचय प्रा. संध्या महाजन तर आभारप्रदर्शन प्रा.किरण कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.जयंत इंगळे, प्रा.निलिमा खडके, प्रा.सुर्यकांत बोईनवाड, प्रा.विजय भोई, प्रा.मयुरी हरिमकर यांनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp