चोपडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस साजरा.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/08/2023

चोपडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस साजरा....

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           चोपडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस साजरा....
           चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील वाणिज्य विभागातर्फे 'आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवसानिमित्ताने 'सी. ए. आपल्या भेटीला' या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सनदी लेखापाल प्रियंका मनीष टाटीया तर प्रमुख पाहुणे म्हणून सनदी लेखापाल धनश्री सतिश गुजराथी तसेच  महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन सोनवणे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. पाटील, पर्यवेक्षक ए. एन.बोरसे, समन्वयक पी.एस. पाडवी व दिपक करंकाळ आदि मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
             या कार्यक्रमाच्या उद्‌घाटक प्रियंका टाटीया म्हणाल्या की, 'इच्छाशक्ती असेल तर मार्ग दिसेल'. यावेळी त्यांनी विद्यार्थांना CA कोर्स बद्दल मार्गदर्शन केले. धनश्री गुजराथी मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की,  'विदयार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून सीए होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी'. अध्यक्षीय भाषणाप्रसंगी उपप्राचार्य एन. एस.कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
            या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता 11 वी व 12 वीच्या  विद्यार्थ्यांनी  आलेल्या मान्यवरांना शंका विचारून यशाचा मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवृत्ती पाटील यांनी केले तर आभार विवेकानंद शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  एस. टी. शिंदे, संदिप पाटील, सौरव जैन, विशाल बोरसे, साक्षी गुजराथी, निकीता शर्मा व धिरज बावीस्कर यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp