संस्कृत भाषा भारताचा आत्मा आहे - प्रा.डॉ.अखिलेश शर्मा. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/08/2023

संस्कृत भाषा भारताचा आत्मा आहे - प्रा.डॉ.अखिलेश शर्मा.


 जळगाव (प्रतिनिधी) : - -

          संस्कृत भाषा भारताचा आत्मा आहे - प्रा.डॉ.अखिलेश शर्मा.

            भारतात दरवर्षी श्रावणी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये संस्कृत दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अखिलेश शर्मा (संस्कृत विभाग मू.जे.-स्वायत्त महाविद्यालय) यांनी संस्कृत दिन साजरा करण्याचा उद्देश विशद करताना संस्कृत हा भारताचा आत्मा आहे, संस्कृत भाषेला योग्य स्थान मिळाले पाहिजे.

          तसेच संस्कृत भाषा जनसामान्यांपर्यंत पोचविता आली पाहिजे असे प्रतिपादन केले. ते पुढे असे म्हणाले की,  संस्कृत ही जगाचे कल्याण, शांती, सहकार्य आणि वसुधैव कुटुंबकम संकल्पना रुजविणारी भाषा आहे. त्यामुळे संस्कृत आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही.


            याप्रसंगी निबंध स्पर्धा, सुभाषित पठन स्पर्धा, संस्कृत गीत गायन स्पर्धा, स्तोत्र पठन स्पर्धा व प्रश्नोतरी स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 107 स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे मेडल, पुस्तक व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या स्पर्धांचे परीक्षण प्रा. दिपक चौधरी, प्रा.गणेश सूर्यवंशी, प्रा.ज्योती मोरे, प्रा.ईशा वडोदकर यांनी केले.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.श्रीमती करुणा सपकाळे होत्या.याप्रसंगी तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील, प्रा. प्रसाद देसाई तसेच कला मंडळ अध्यक्ष प्रा.योगेश धनगर, संस्कृत विभाग प्रमुख प्रा.अर्जुन शास्त्री मेटे, प्रसिध्दी समिती प्रमुख डॉ.अतुल इंगळे उपस्थित होते.

 

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अर्जुन शास्त्री मेटे, सूत्रसंचालन प्रा.संध्या महाजन, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.मयुरी हरीमकर तर आभार प्रदर्शन प्रा. विजय भोई यांनी केले. याप्रसंगी कला मंडळ सदस्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp