आत्मक्लेश आंदोलनाचे शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

31/08/2023

आत्मक्लेश आंदोलनाचे शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          झिरो लोडशेडींग बंद करून दुष्काळ जाहीर करावा व चो.सा.का. ने  कबूल करून शेतकऱ्यांचे थकीत पैसे न दिल्याने आत्मक्लेश आंदोलनाचे शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन....

           डोक्यावर दुष्काळाचे ढग असताना व 75 % हंगाम हातचा गेला असताना वेळीच कृत्रिम पाऊस पाडण्याची विनंती लक्षात न घेतल्याने आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कूपनलिका द्वारे  थोडेफार येणारे पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असताना वीज मंडलने शेती वीज पंपासाठी झिरो लोड शेडींग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

         त्यासाठी भलेही औद्योगिक वीज कमी द्या, पण शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या, म्हणजे किमान खायची तरी सोय होईल तसेच सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेच्या मास्टर परिपत्रक RBI/2015 - 16/68 FIDD. No. FSD. BC.01 /05.10.001/2015-16 July 01, 2015 नुसार तातडीची  व इतर मदत द्यावी.तसेच वीज मंडळाने तात्काळ निर्णय न घेतल्यास सोमवार नंतर केव्हाही तालुक्यात विविध ठिकाणी रस्ता रोको करण्यात येतील असे शेतकरी कृती समितीच्या निवेदनात नमूद केले आहे. त्याची प्रत मा.ना. गुलाबराव पाटील (पालकमंत्री) , मा.ना.गिरीश महाजन , मा.ना. अनिल पाटील साहेब (मदत व पुनर्वसन मंत्री) , मा.श्री आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी जळगाव) यांना देण्यात आल्या आहेत.


          तसेच शेतकऱ्यांचे 2014 / 15 चे ऊस बिलातील ठेव म्हणून ठेवलेली 150 /- रु. प्रतिटन प्रमाणे रक्कम रु. 3 • 30 कोटी अद्याप न मिळाल्याने कारखान्याचे व्हा चेअरमन एस बी पाटील हे  11 सप्टेंबर 2023 पासून "आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण" करणेबाबत चे देखील निवेदन देण्यात आले.

          यावेळी एस बी पाटील, प्रशांत पाटील, कुलदीप राजपूत,भागवत महाजन, प्रा प्रदीप पाटील, जगदीश बोरसे, संतोष पाटील, गुलाब पाटील, बी आर एस पक्षाचे दीपक पाटील हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp