चोपडा महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/08/2023

चोपडा महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार . . . .


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार . . .

          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांच्या 'सत्कार समारंभाचे' आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर निवड झालेल्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एम.बागुल, मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. एम. एल. भुसारे यांना उत्कृष्ट संशोधन (पब्लिकेशन्स) तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.के.डी.गायकवाड यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे उत्कृष्ट संशोधन (पेटंट) या बद्दल पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्याबद्दल या सर्व गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते  करण्यात आला.


           यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील यांनी 'प्राध्यापकांच्या यशस्वी कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडत आहे. हा सन्मान संस्थेच्या व महाविद्यालयाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. यापुढे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवावा व त्याचा समाजासाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी फायदा करून द्यावा' असे प्रतिपादन त्यांनी केले.


          या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp