स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2023 या राष्ट्रीय अहवालात पक्षी निरीक्षक हेमराज पाटील यांच्या नोंदींची निवड - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/09/2023

स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2023 या राष्ट्रीय अहवालात पक्षी निरीक्षक हेमराज पाटील यांच्या नोंदींची निवड

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2023 या राष्ट्रीय अहवालात पक्षी निरीक्षक हेमराज पाटील यांच्या नोंदींची निवड 

           देशभरातील 942 पक्षी प्रजातींच्या प्रदीर्घ कालावधीत नोंदी करणाऱ्या पक्षी निरीक्षकांच्या नोंदीच्या आधारे दिल्ली येथे 30 ऑगस्ट शुक्रवारी रोजी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, मुंबई सह वेटलँड इंटरनॅशनल्स , वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया , वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर - इंडिया , झूऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इ. तेरा सरकारी व गैरसरकारी पक्षी व निसर्ग विषयक संशोधन करणाऱ्या संस्थांनी दुसरा देशव्यापी राष्ट्रीय अहवाल स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2023 (भारतातील पक्ष्यांची स्थिती ) प्रकाशित केला.


          या अहवालात चोपडा येथील पक्षी-वन्यजीव अभ्यासक व संवर्धक हेमराज पाटील यांचे 1123 पक्षी निरीक्षणाचे सर्वे रिपोर्ट गृहीत धरण्यात आले. या कामगिरीसाठी त्यांना संशोधक संस्थांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले. यापैकी निम्म्याहून अधिक सर्वेक्षण सातपुड्यातील असून आतापर्यंत एकट्या चोपड्यात 226 स्थानिक व स्थलांतरित पक्षी प्रजातींच्या नोंदी विविध ऋतूत घेण्यात आल्या आहेत.अनेक नोंदी या ग्रामीण, शहरी भागातील तसेच देशातील विविध अभयारण्य क्षेत्रातील आहेत. चोपड्यातील व्हाईट रंपेड शमा , ट्रि क्रीपर , जेर्डन्स बुशलार्क व इतर पक्षी प्रजातींची विशेष दुर्लभ नोंद आहे. महाराष्ट्रात एकूण 577 पक्षी प्रजाती आढळतात. तुलनेने चोपडा तालुक्यात आतापर्यंत 226 पक्षी प्रजाती आढळून आल्या ही चोपड्यासाठी अभिमानाची बाब असून व विशेषत: सातपुड्यातील समृद्ध पक्षी वैभवाची निसर्गाची देणगीचे द्योतक आहे.


          यापूर्वी देखील कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्नीथॉलॉजी , न्यूयॉर्कद्वारा पक्षी स्थलांतर , वितरण व स्थितीदर्शक आंतरराष्ट्रीय संशोधन अहवालात तीन वेळा तर  स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2020 या प्रथम राष्ट्रीय अहवालात हेमराज पाटील यांच्या नोंदीची विशेष दखल घेऊन मोठ्या प्रमाणात डेटा गृहीतक म्हणून उपयोगात घेतला आहे.

         या विशेष यशाबद्दल सहाय्यक वनसंरक्षक श्री प्रथमेश हाडपे , वनपरिक्षेत्राधिकारी श्री एस एम सोनवणे , श्री बी के थोरात , श्री आनंदा पाटील , श्री गोपाल बडगुजर , यावल व जळगाव वनविभागाचे सर्व अधिकारी , वनपाल , वन कर्मचारी तसेच सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे सर्व सदस्य , विवेकानंद परिवार यांनी श्री हेमराज पाटील यांचे अभिनंदन केले.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

           या अहवालात समुद्रकिनारी व गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या अधिक चिंताजनक आहे. आकाराने छोटे पक्षी जसे लिटल टर्न , कंठेरी चिखल्या , पाण भिंगरी , मोठा करवानक इ. प्रजाती धोक्यात आल्या आहेत. पैकी पहिल्या तिन्ही प्रजातींची नोंद चोपड्याच्या उत्तरेला सातपुड्यातील विविध पाणथळ ठिकाणी घेण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प , वाळू उत्खनन , अतिरिक्त मानवी हस्तक्षेप , अनियंत्रित प्रदूषण, नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास , हवामान बदल , तापमान वाढ या प्रमुख कारणांमुळे पक्षी जगत धोक्यात आले आहे.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp