Actuarial Science क्षेत्रात रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध -- प्रा.मनोज पाटील. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/09/2023

Actuarial Science क्षेत्रात रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध -- प्रा.मनोज पाटील.


 जळगाव (प्रतिनिधी) : - -

          Actuarial Science क्षेत्रात रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध -- प्रा.मनोज पाटील.

         जळगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय जळगाव येथे गणित विभागातर्फे 'गणित व संख्याशास्त्र आणि Actuarial Science विषयाची व्याप्ती तसेच रोजगाराच्या संधी' या विषयावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या School of Mathematical Science येथील प्रा.मनोज पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.

          यावेळी त्यांनी गणिताचे महत्त्व विषद करतांना मॅथेमॅटिक्स इज द युनिव्हर्सल लैंग्वेज ऑफ पॅटर्न अँड रिलेशनशिप असे सांगून त्याचा शेअर मार्केटशी कसा संबंध येतो हे सोदाहरण स्पष्ट केले. ते पुढे असेही म्हटले की आय.आय.पी.एस. , एन.पी.टी.इ. एल. , ए.सी.इ.टी. या गणित विषयाशी संबंधित परीक्षांच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होऊ शकतो असे नमूद करून 2019 ते 2029 या दशकात रोजगाराची वाढ 35 %पर्यंत असू शकते. डाटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयात प्रावीण्य संपादन करण्यासाठी गणित विषयाचा पाया भक्कम करणे अत्यावश्यक आहे.


            या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान व  वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या उपप्रचार्या श्रीमती प्रा.के.जी. सपकाळे यांच्या शुभहस्ते श्री.मनोज पाटील सरांचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, तिन्ही विद्या शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती ब-हाटे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा.उमेश पाटील, गणित विषय इन्चार्ज प्रा.छाया चौधरी उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  प्रा.लीना भारंबे, प्रास्ताविक प्रा.छाया चौधरी, प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.प्रमोद भोई व आभारप्रदर्शन प्रा.कविता भारुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणित विभागातील प्रा.घनश्याम सोनवणे, प्रा.प्रज्ञा पाटील, प्रा.छाया पाटील, प्रा.ज्योती सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp