चोपडा (प्रतिनिधी) : - -
सलग आठव्या वर्षी महा बिजारोपणातून हिरवळ फुलविण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न..
पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका जंगलांची आहे. अगदी शहरी भागातही भरपूर वृक्ष लागवड करून त्यानुसार प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मार्गांनी जंगलतोड कमी करणे, अधिक झाडे लावणे, प्रदूषण घटवणे, योग्य जीवनशैली राखणे अशा मुद्यांवर सर्वांगीण जागृती व प्रसार करणे आवश्यक आहे. परंतु त्याहीपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणे या विचार ध्येयाने प्रेरित होऊन येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी देखील मान्सून पूर्व व मान्सून कालावधीत 2800 वनवृक्षांचे बीज रोपण कक्ष क्रमांक 266 मध्ये करण्यात आले. मान्सूनपूर्व लावलेली बीज अंकुरले असून अनुकूल वातावरणामुळे सुदृढ वाढ होत आहे. तसेच श्रावण महिन्यात 200 पेक्षा अधिक देव वृक्ष बेलाचे बीज लावण्यात आले. मानवी समाज व संपूर्ण सजीवांचे अस्तित्व टिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वृक्षांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधून वृक्षाबंधन साजरे करून ऋण व्यक्त करण्यात आले.

आपल्या एकमेव वसुंधरेचे वय 4•5 अब्ज वर्ष इतके असून मानवी जीवन अस्तित्व अगदी सामान्य आहे. परंतु आपण ज्या पृथ्वीवर राहतोय , तिच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण छोट्या छोट्या कृतीतून सर्वांनी हातभार लावणे काळाची गरज आहे. या विचारांनी प्रेरित सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेच्या सर्व सदस्यांतर्फे 2016 पासून सातपुडा पर्वतराजीत लासुर , सत्रासेन , चौगाव , कृष्णापुर , बोरअजंटी, वैजापूर , कर्जाणे , देवझिरी , मालापुर , खाऱ्यापडाव , विष्णापूर इ. वनपट्ट्यात महाबीज रोपणाद्वारे अद्याप पर्यंत 32000 पेक्षा जास्त विविध वृक्ष बीज जसे की केसरी पळस, पिवळा पळस , बेल , पिंपळ , चिंच , आंबा , कवठ , खैर , शिवण , अंजन , बिब्बा , सिताफळ , रामफळ , विलायती चिंच , बहावा , सोनसावर , पांगारा , आवळा , जांभूळ, लाल काटेसावर , रिठा , निम , करंज इत्यादी सारख्या वृक्ष प्रजातींचे बीज रोपण करण्यात आले आहे तर 3000 पेक्षा जास्त विविध वृक्षांची रोपे लावण्यात आले आहेत. वरीलपैकी सरासरी एक तृतीयांश पेक्षा अधिक बीजरोपे सद्यस्थितीत अस्तित्व टिकवून आहेत. वृक्ष व बिजरोपणासाठी वनविभागाचे सर्व आजी-माजी अधिकारी , कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य असते तर संस्थेचे सदस्य अश्विनी पाटील , आर्यदीप पाटील ,अनिल शिंपी , अश्फाक पिंजारी, शबनम पिंजारी, सोनल नेवे, स्वप्निल नेवे , अमोल डूडवे , भाग्यश्री असोदेकर , अनुसया जोशी , कृष्णप्रिया पाटील , देवेंद्र बिऱ्हाडे , सागर बि-हाडे , लोकेश पाटील , योगेश देवराज , धनंजय बागुल , जयेश बडगुजर , घनश्याम वैद्य , राहुल महाजन , हेमराज पाटील यांचे अनमोल परिश्रम लाभतात.
वृक्षारोपणासोबतच निसर्ग ,पक्षी , वने व वन्यजीव सेवेसाठी 40 होऊन अधिक विविध प्रकारचे शिक्षण , संशोधन , संवर्धन व प्रबोधन स्वरूपात कृती योजना राबविण्यात येतात. यासाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य संस्थापक अध्यक्ष श्री हेमराज पाटील यांचेकडून लाभते. सातत्यपूर्ण वृक्षारोपण व बिजारोपणात योगदान देणाऱ्या सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे उपवन विभाग चोपडा आणि यावल व जळगाव वनविभाग तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment