स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.(स्वायत्त) कॉलेज जळगाव येथे भूगोल विभागातर्फे 'भूगोल विषयात करियर संधी' यावर व्याख्यान आयोजित.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/09/2023

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.(स्वायत्त) कॉलेज जळगाव येथे भूगोल विभागातर्फे 'भूगोल विषयात करियर संधी' यावर व्याख्यान आयोजित....

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

          स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.(स्वायत्त) कॉलेज जळगाव येथे भूगोल विभागातर्फे 'भूगोल विषयात करियर संधी' यावर व्याख्यान आयोजित....

             जळगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज) जळगाव येथे भूगोल विभागातर्फे ' भूगोल विषयात करियर संधी ' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा.डॉ.चेतन महाजन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.


         यावेळी प्रा.डॉ.चेतन महाजन यांनी विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची ओळख व माहिती विस्तृतपणे विषद करून भूगोल हा विषय अत्यंत व्यापक असून यात अनेक विषयांचा अंतर्भाव व सहसंबंध त्याची खोली वाढवतो असे प्रतिपादीत केले. भूगोल या विषयात वेगवेगळ्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व असून अद्ययावत अशा करियरच्या संधी उपलब्ध आहेत. यात जीओ इन्फार्मेटिक्स, जीआयएस, रिमोट सेन्सींग, सर्व्हेअर, टूरिझम या प्रमुख क्षेत्रात करियरची बहुविध दालने खुली असून यात करिअरच्या नानाविध संधी उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या शंकांना समर्पक उत्तरे देत यथार्थ मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. करुणा सपकाळे तर तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक प्रा.स्वाती ब-हाटे, प्रा.उमेश पाटील, प्रा.प्रसाद देसाई उपस्थित होते.


           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय भूगोल विषय इन्चार्ज प्रा. उमेश पाटील, सूत्रसंचालन प्रा.दिपक चौधरी तर आभारप्रदर्शन प्रा.उमेश ठाकरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अर्जुन मेटे, प्रा.जयंत इंगळे, प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा.डी. एच.कोळी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp