प्रताप विद्या मंदिराचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/09/2023

प्रताप विद्या मंदिराचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन . . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          प्रताप विद्या मंदिराचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन . . . .

         चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन करून चोपडा नगरीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. दि. 21संप्टेंबर ला स्व. बाबासाहेब के नारखेडे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय वकृत्व, गीत गायन व निबंध स्पर्धा भुसावळ येथील के नारखेडे येथे संपन्न झाल्या.

 

       यात प्रताप विद्यामंदिराने आपले विविध स्पर्धेतील वर्चस्व कायम टिकवून विजयी यशाची पताका फडकावून घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धेतील गट क्रमांक 2 (7 वी / 8वी) वकृत्व स्पर्धेत इ. 8 वी ची विद्यार्थिनी कु . मुग्धा विजय याज्ञिक हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सदर स्पर्धेतील गट क्रमांक 3 (इ 9 वी / 10वी) यातील उत्स्फूर्त वकृत्व स्पर्धेत इ. 10 वीची विद्यार्थिनी दिव्या गजानन पाटील हिने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. गट क्रमांक   4 ( 11वी / 12वी) मधील वकृत्व स्पर्धेत 11वीची विद्यार्थिनी रोशनी देविदास पाटील हिने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केला. याच गट क्रमांक 4 ( 11वी / 12वी) मधील उत्स्फूर्त वकृत्व स्पर्धेत 12 वीची विद्यार्थिनी सायना कायम पठाण हिने राज्यस्तरीय द्वितीय तसेच सुगम संगीत गायन स्पर्धेत गट क्रमांक 2( 9वी / 10वी) मधील गटात घनश्याम रवींद्र कोळी हा 9 वी चा विद्यार्थी राज्यस्तरातून प्रथम आला आहे.

 

         तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत गट क्रमांक 2 ( 7 वी/ 8वी) यामध्ये स्पर्श डीगंबर पाटील या 7 वीच्या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. गट क्रमांक 4 (11वी / 12वी) मध्ये भूमिका नंदलाल तांबट 11 वी ची सायन्स ची विद्यार्थिनी हिने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे . या विद्यार्थ्यांना श्री व्ही ए गोसावी व पी बी कोळी आदींनी मार्गदर्शन केले.


           सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सौ  शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन  राजा मयूर,  सचिव माधुरी मयूर , संचालक चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी,  रमेश जैन, प्र. वि. म.चे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील , संस्थेने समन्वयक गोविंद गुजराथी , सर्व शिक्षक बंधू भगिनीनी आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp