चोपडा { S महाराष्ट्र 7 न्युज नेटवर्क }
पाच दिवसाच्या पाहुणचारा नंतर गुलाल उधळत ; ढोल ताश्याच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या म्हणत जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप . . . .
चोपडा शहर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात शांततेत व सुरळीत विसर्जन . . . .
चोपड्यात सालाबादा प्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाला पाच दिवसाच्या पाहुणचारा नंतर पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला. त्यावेळी सर्वच लहान-मोठया 61 सार्वजनिक व काही खजिगी मंडळानी मिरवणूक काढून बाप्पाला दिला. काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास विसर्जन मिरवणूकीस सुरुवात झाली. कोरोना व शासनाचे निर्बंध उठल्यावर या वर्षी गणेश भक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाला. त्यावेळी गुलालाची उधळण करत बाप्पाचा जयघोष करत मिरवणूक थाटात सुरुवात झाली. संपूर्ण चोपडा शहर बाप्पामय झाले होते.
बाप्पाचा निरोप समारंभाची मिरवणूक गांधी चौक येथून सुरुवात होऊन विवेकानंद हॉस्पिटल समोरून राणी लक्ष्मीबाई चौकातून शहर पोलीस स्टेशन व जामा मशीदी समोरून मेन रोड वरून बॉम्बे लॉज समोरून वळसा घेत बोहरा गल्लीतून मुस्तुफा बाबा मशीदी समोरून आझाद चौक मार्गे, पाटील दरवाज्या समोरून आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तापी नदीत व चहार्डी येथील दगड खदाणीच्या तलावात श्रींच्या मुर्त्या विसर्जित करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी गणेश भक्तांचे नगरपालिका प्रशासनातर्फे न. पा. अधीकारी व कर्मचारी , राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चो सा का चेअरमन चंद्रहास गुजराथी व कार्यकर्ते, आय कॉग्रेस तर्फे ऍड संदीप पाटील व कार्यकर्ते, शिवसेना (शिंदे गटाकडून) आ. लताताई सोनवणे, माजी आ. चंद्रकांत सोनवणे व कार्यकर्ते, शिवसेना (उ ठा बा गटाकडून) राजेंद्र पाटील (बिटवा राजु), किशोर चौधरी व कार्यकर्ते, भा ज पा तर्फे गजेंद्र जैस्वाल,आत्माराम माळके व कार्यकर्ते, राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित दादा गटाकडून) सुनिल पाटील - वाळकी व कार्यकर्ते यांनी बाप्पाच्या भक्तांचे व गणेश मंडळांचे स्वागत केले.
गणपती विसर्जणासाठी नगरपालिकेने तापी नदीपत्रात व चहार्डी येथील दगड खदाणीच्या तलावात लाईट व्यवस्थे सह क्रेनची सोय केली होती. मूर्तीचे विसर्जन करताना त्या मुर्त्या न. पा. ने क्रेनच्या मदतीने नदीपात्रात विसर्जित केल्या याकमी न. पा. मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली न. पा. कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
माणूस उभा वर्दीतला
म्हणून सण साजरा होतो गर्दीतला
गणेश विसर्जनच्या बंदोबस्तसाठी चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, जळगाव, यावल, अमळनेर, स्थानिक गुन्हे शाखा, राज्य राखीव दल, होमगार्ड आदी कर्मचाऱ्यांसह, महसूल विभागातील चोपडा प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात सर्व नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विसर्जन शांततेत व सुरळीत पारपाडण्यासाठी श्री. रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ, श्री. कॄषीकेश रावले सहा.पोलीस अधिक्षक चोपडा भाग, श्री. नंदवाडकर उपविभागीय पोलिस अधिकारी अमळनेर भाग, श्री. कुलकर्णी प्रो.डि.वाय.एस.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पो. नि. श्री. के.के. पाटील व चोपडा ग्रामीण पो. नि. कावेरी कमलाकर यांच्या सह स.पो.नि. अजित सावळे, स.पो.नि. संतोष चव्हाण व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी " माणूस उभा वर्दीतला ; म्हणून सण साजरा होतो गर्दीतला " या उक्ती प्रमाणे चोख बंदोबस्त ठेऊन गणेश विसर्जन शांततेत व वेळेवर पारपडले.
WhatsApp
No comments:
Post a Comment