राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व -- प्रा.डॉ.डिंपल पाटील - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/09/2023

राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व -- प्रा.डॉ.डिंपल पाटील


 जळगाव (प्रतिनिधी) : - -

          राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व -- प्रा.डॉ.डिंपल पाटील.

          जळगाव येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिनाच्या निमित्ताने कला मंडळाच्या वतीने हिंदी पखवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय हिंदी दिनाचे औचित्य साधून दि. 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान निबंध लेखन, वकृत्व, गीत गायन व प्रश्न उत्तरे, कथाकथन व हिंदी अनुवाद लेखन अशा नानाविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना एसएनडीटी महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.डिंपल पाटील यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


            याप्रसंगी प्रा.डॉ.डिंपल पाटील यांनी हिंदी भाषेची ओळख व भाषेचा पूर्व इतिहास विशद करून राष्ट्रभाषा हिंदी व राजभाषा हिंदी यातील फरक समजावून सांगितला.हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की,राष्ट्र निर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे होत्या. पर्यवेक्षक प्रा. आर. बी.ठाकरे, विज्ञान शाखा समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय हिंदी विषय शिक्षिका प्रा.ज्योती मोरे यांनी केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 12 वी कला शाखेची विद्यार्थिनी गीता पंडित व प्रा.ज्योती सोनवणे यांनी तर 11 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी सिद्धांत नन्नवरेने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला मंडळाच्या सर्व सदस्य प्राध्यापक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp