भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक ~ ~ चेतन पाटील - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/09/2023

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक ~ ~ चेतन पाटील

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

         भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक ~ ~ चेतन पाटील

          दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते आणि ती भेसळ कशी ओळखायची याचे प्रात्यक्षिक आज के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या  रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात विकास येथील क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी श्री.विजेश परमार तसेच केमिस्ट श्री. चेतन पाटील यांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.


           या प्रसंगी श्री.चेतन पाटील यांनी भेसळयुक्त दूध कसे तयार केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवून ते कसे ओळखायचे, तसेच हे दूध शरीरास किती घातक आहे याचे विवेचन केले. ते पुढे म्हटले की, सण-समारंभाच्या काळात दुग्धजन्य पदार्थांमध्ये विशेषतः मिठाई,खव्यात कशा पद्धतीने बेमालूमपणे भेसळ केली जाऊन ते मार्केटमध्ये आणून सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारले जाते व ते आरोग्यासाठी किती घातक आहे हे सांगितले. त्यांनी पुढे असेही प्रतिपादन केले की, जास्तीत जास्त दूध मिळविण्याच्या हव्यासापोटी कोणत्या घातक केमिकल्स वापर करून गाई-म्हशींच्या आरोग्याशी खेळ केला जातो याबाबतचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे होते. तसेच विज्ञान शाखेच्या समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, रसायनशास्त्र विभाग इन्चार्ज प्रा.राजश्री महाजन उपस्थित होत्या.

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.विजेश परमार व श्री.चेतन पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रा.श्री.राजेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रसायशास्त्र विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp