प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड - प्रा.दिलीप भारंबे. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/09/2023

प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड - प्रा.दिलीप भारंबे.

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

          प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड - प्रा.दिलीप भारंबे.

          जळगांव येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांची भौतिकशास्त्र विषयाची अनामिक भीती दूर करण्यासाठी नुकतेच मराठी विज्ञान परिषद जळगावचे सचिव प्रा.श्री. दिलीप भारंबे यांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी भौतिकशास्त्रातील इ. 11 वी, 12 वी स्तरावरील असंख्य वैज्ञानिक प्रयोग सादर करीत विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढवत त्यांची भौतिकशास्त्रा बद्दलची भीती किती अनाठायी आहे हे विषद करतांना अध्ययनातील प्रात्यक्षिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.


         या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.श्री.भारंबे सरांचा पर्यवेक्षक प्रा.श्री. आर.बी.ठाकरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. श्री. आर.बी.ठाकरे, विज्ञान शाखेच्या समन्वयिका प्रा.सौ. स्वाती बऱ्हाटे, प्रा.सौ. शिल्पा सरोदे (इन्चार्ज भौतिकशास्त्र विभाग) उपस्थित होत्या.


           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.श्रीमती. शीतल काळे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्र विषयाच्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp