जळगाव (प्रतिनिधी) : - -
स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे -- डॉ.अनिल क्षीरसागर.
जळगाव येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे इंग्रजी विभागाच्या वतीने इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल या विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर (सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग मू.जे.महाविद्यालय) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात त्यांनी जीवनात संभाषणाचे महत्त्व विषद करून संभाषणाचे विविध प्रकार कोणते असतात हे स्पष्ट करताना संभाषणाशिवाय आयुष्य किती अर्थहीन आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. पुढे त्यांनी आपल्या ओघावत्या शैलीत असे प्रतिपादन केले की, स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये क्षमताधिष्ठीत, स्किल बेस्ड अभ्यासक्रमात संभाषण कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व असून उत्कृष्ट संभाषण कौशल्याच्या साहाय्याने जीवनामध्ये प्रचंड यशस्वी होता येते हे स्पष्ट करत इंग्रजीतून बोलण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी भीती किती निरर्थक आहे हे सांगून त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच संभाषण करीत असताना शब्दसंग्रह अत्यंत उपयुक्त असून त्यांनी BBC Learning English.com , Oxford learnerdictionaries.com ह्या दोन संकेतस्थळांचा सखोल अभ्यास करावा असे सुचविले.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्य श्रीमती के.जी. सपकाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक प्रा.आर. बी.ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील, प्रा. प्रसाद देसाई व इंग्रजी विषय इन्चार्ज डॉ.अतुल इंगळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अतुल इंगळे, सूत्रसंचालन प्रा.योगेश धनगर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सुरेखा पाटोळे, आभार प्रदर्शन प्रा.संदीप गव्हाळे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.रूपम निळे, प्रा.दिपक चौधरी, प्रा.जयंत इंगळे, प्रा.किरण कोळी, प्रा.गणेश सूर्यवंशी, प्रा.संध्या महाजन यांनी परिश्रम घेतले.
WhatsApp
No comments:
Post a Comment