न. पा. संचलित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी पोस्ट मॅपिंग न झाल्यामुळे वेतनापासून वंचित राहणार. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/09/2023

न. पा. संचलित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी पोस्ट मॅपिंग न झाल्यामुळे वेतनापासून वंचित राहणार.

जळगाव (प्रतिनिधी) : - -

     न. पा. संचलित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी पोस्ट मॅपिंग न झाल्यामुळे वेतनापासून वंचित राहणार.

           राज्य शालेय शिक्षण विभाग व शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयांचा पोस्ट मॅपिंग कार्यक्रम सुरू असून वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयांकडून प्रत्येक विद्यालयांच्या आस्थापनेवर संच मान्यतेनुसार मंजूर पदे कार्यरत असलेली, सेवानिवृत्तीने रिक्त असलेली, तसेच अतिरिक्त शिक्षक - शिक्षकेत्तर पदे यांचा आढावा घेतला जात असून या प्रक्रियेसाठी प्रत्येक विद्यालयाला यु डायस नंबर व संस्थेच्या नावानिशी संस्था कोड आवश्यक असतो. मात्र नगरपालिका प्रशासन संचलित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असून ऑनलाइन प्रक्रियेमध्ये या विद्यालयांना संस्था कोड  मिळालेलाच नसल्याने ही सर्व विद्यालये आज अखेर पोस्ट मॅपिंग कार्यक्रमापासून वंचित आहेत.

          यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा नजीकच्या भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. माहे सप्टेंबर 2023 च्या वेतन देयकांसोबत ऑनलाईन पोस्ट मॅपिंग केल्याची प्रत, 2022 / 23 ची संच मान्यता, मंजूर पदे भरलेली पदे, रिक्त पदे, अतिरिक्त पदे यांची मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याकडे सादर केलेली माहिती, रोष्टर मंजुरीची प्रत, पदे डिलीट करण्याबाबत मुख्याध्यापक/प्राचार्यांचे पत्र, शालार्थ प्रणालीत बँक खाते 16 अंकी असलेल्याबाबतचे प्रमाणपत्र व बँक खाते अप्रूव्ह करणे इ.कागदपत्रे सादर करणे अत्यावश्यक आहे.

          त्याशिवाय सप्टेंबरचे वेतन अदा होणार नाही असे पत्र वेतन व भ.नि. नि.पथक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले असल्यामुळे जर संबंधित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयांचे पोस्ट मॅपिंग विहित मुदतीत झाले नाही तर सदर कर्मचारी हे वेतनापासून वंचित राहतील. हे सर्व कर्मचारी कायमस्वरूपी कर्मचारी असून काही तुकड्या 20 , 40 % अनुदान टप्प्यावर आलेल्या असून अशा साऱ्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी होणार आहे. सदर समस्येच्या निराकरणासाठी  राज्यातील सर्व विभागातील सन्माननीय शिक्षक, पदवीधर आमदार महोदयांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून तात्काळ सर्वमान्य तोडगा काढण्याचा आग्रह धरावा

         अशी मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीने प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव), प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष), डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष) प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी. पाटील (जेष्ठ मार्गदर्शक) यांनी पदवीधर व शिक्षक आमदार सत्यजित तांबे, विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, सतीश चव्हाण, किशोर दराडे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp