नाशिक येथील सत्यशोधक अधिवेशन बाबत लासूर येथे बैठक संपन्न - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/09/2023

नाशिक येथील सत्यशोधक अधिवेशन बाबत लासूर येथे बैठक संपन्न

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           नाशिक येथील सत्यशोधक अधिवेशन बाबत लासूर येथे बैठक संपन्न

          महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे शिक्षण विषयक कार्य सुरू असताना सनातन वाद्यांचा त्यांना जो अनुभव आला त्या सनातनवादापासून शूद्र/अति शूद्र समाजाची म्हणजेच बहुजनांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाचे निर्मिती केली. व देवाच्या भेटीला जाताना मध्यस्थ नाकारला. सारे क्रिया कर्म आपल्या सत्यशोधक विधी द्वारे करू शकतो असे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यावर लिहून ठेवले आहेत.

           सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या 150 व्या वर्धापन दिनी येत्या 24 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे आयोजित सत्यशोधक समाजाच्या 35 व्या राज्य अधिवेशनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे असे आवाहन समन्वयक विजय लुल्हे सर यांनी केले. त्यावेळी सत्यशोधक समाजाचे प्रसिद्धी सचिव तथा समन्वयक श्री विजय लुल्ले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती सांगून सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट पटवून सांगितले. बैठकीत अधिवेशनासाठी लासूरकरांनी मदत गोळा करून दिली.

        त्याप्रसंगी बैठकीचे अध्यक्षस्थानी लासूर येथील संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन शंकर माळी होते या बैठकीला   हिम्मतराव महाजन, गोविंद दगा माळी, आर एन पवार सर ,सुरेश पवार , डॉ अमृतराव महाजन, भास्कर महाजन, प्रविण मगरे, सुरेश माळी, देविदास मगरे, योगेश्वर माळी, नंदलाल माळी, शिवदास मगरे, साखरलाल माळी, राजू भाऊसाहेब, जीभाऊ टेलर आदि उपस्थित होते

         सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार श्री संत सावता माळी युवक संघाचे राज्य अध्यक्ष श्री जितेंद्र महाजन यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp