ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे स्वच्छता पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/10/2023

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे स्वच्छता पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे स्वच्छता पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन...

          महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

          इयत्ता 1 ली 2 रीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छतेचा संदेश देणारे विविध आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांनी याप्रसंगी रेखाटली. त्यासाठी त्यांना शाळेतील कलाशिक्षक देवेंद्र बारी व सोनाली देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

         इयत्ता 3 री व 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील व कीर्ति चौधरी यांनी स्वच्छता अभियान या विषयावर निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

           इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका वैशाली गायकवाड व सुषमा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

          इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थीयांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करुन मुलांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिकच्या गैरवापराचे होणारे हानिकारक परिणाम देखील विद्यार्थ्यांनी पटवून दिले. पथनाट्यासाठी विद्यार्थ्यांना उपप्राचार्य अमन पटेल आणि शाळेतील शिक्षिका दीपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

          राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील व अश्विनी ढबू यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रा विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp