सूरमाज़ फाऊंडेशन तर्फे कमला नेहरू मुलींचे वसतीगृहात फळं वाटप करून ईद-ए-मिलाद साजरी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/09/2023

सूरमाज़ फाऊंडेशन तर्फे कमला नेहरू मुलींचे वसतीगृहात फळं वाटप करून ईद-ए-मिलाद साजरी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          सूरमाज़ फाऊंडेशन तर्फे कमला नेहरू मुलींचे वसतीगृहात फळं वाटप करून ईद-ए-मिलाद साजरी

          हिंदू -मुस्लीम, सिख्ख- ईसाई असा कोणताही भेद न करता मानवता हा एकच धर्म असल्याची शिकवण आपल्यात रुजली पाहिजे. मोठ्यांचा आदर, एकमेकांविषयी जिव्हाळा, बालकांवरील प्रेम हे दिवसेंदिवस कमी होत चालले असून हे थांबवून जाती पातीच्य खोल खड्ड्यात न पडता बंधू भाव जोपासावा असा मोलाचा सल्ला सूरमाज़ फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी येथे दिला.

         कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चोपडा येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. मोहम्मद पैगंबर  हे इस्लाम धर्माचे संस्थापक नव्हते, ते अल्लाहचे दूत म्हणून काम करत होते आणि त्यांनी केलेले काम प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने केले पाहिजे आणि ज्या कामाला त्यांनी मनाई केली आहे, त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण आत्मसात केल्या आहेत असेही स्पष्ट केले.

          प्रारंभी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुरमाज फाऊंडेशन वतीने पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीचे औचित्य साधत ईद ए मिलाद निमित्त ५० आदिवासी विद्यार्थींनींना सफरचंद, संत्रा, केळी आदि फळ वाटप करण्यात आले.

        यावेळी अबुल्लैस शेख, मुराद भाई, झियाउद्दीन काझी साहब, डॉ एमडी रागीब, शोएब शेख, जुबेर बेग, शुभम भाई, इम्रान भाई पलंबर, अब्दुल कादिर, डॉ मोहम्मद ज़ुबेर शेख, समाधान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शुभम सोनवणे, पत्रकार महेश शिरसाठ, वसतीगृह अधिक्षिका कावेरी कोळी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp