सातपुड्यात वन्यजीव सप्ताह व जागतिक अस्वल दिन साजरा - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/10/2023

सातपुड्यात वन्यजीव सप्ताह व जागतिक अस्वल दिन साजरा

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           सातपुड्यात वन्यजीव सप्ताह व जागतिक अस्वल दिन साजरा

          अस्वल अधिवास क्षेत्रात सहजीवन व संवर्धनासाठी सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे आवाहन ....

          चोपडा तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतराजीत राखीव वनक्षेत्रात व लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वनक्षेत्रातील सस्तन प्राण्यांच्या संवर्धनासाठी येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे वन्यजीव सप्ताह व  जागतिक अस्वल दिनानिमित्त शेवरे बुद्रुक या ठिकाणी अस्वल व मानव सहजीवन प्रबोधन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


          गेल्या वर्षी शुष्क ऋतूत राखीव वन क्षेत्रात गुरचराईसाठी गेलेल्या तीन व्यक्तींवर वेगवेगळ्या घटनेत अचानक समोर गेल्याने अस्वलाने स्वबचाव आणि पिलांच्या रक्षणार्थ त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला होता. पैकी बिसना बारेला नामक इसम मृत्युमुखी पडला तर दोन व्यक्ती गंभीर घायाळ झाले होते. या पार्श्वभूमीवर अस्वल अधिवास क्षेत्रात वावरताना व रहिवास असताना अस्वलापासून सावधानता कशी बाळगावी , ऐनवेळी बचाव कसा करावा व सहजीवन कसे स्वीकारावे यासंबंधी येथील वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील यांनी आशिया खंडातील अस्वलांसाठी पहिल्या राखीव  दारोजी राष्ट्रीय अभयारण्यातील घडलेल्या सत्य घटनांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कथा आणि संशोधन अभ्यासाच्या आधारावर उपस्थित वनवासी बांधवांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी आर्यदीप पाटील यांने काही कृती प्रात्यक्षिके करून दाखविलीत. अस्वलाची दिनचर्या , वर्तन , खाद्य , सवयी , प्रजनन कालावधी , हल्ला करण्याची पद्धत , हल्ल्यापासून बचाव कसा करावा यावर भाष्य केले.


          भारतात 1952 पासून साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा मुख्य उद्देश वन्यजीव संरक्षण व संवर्धन असून हा हेतू यशस्वी होण्यासाठी , उपस्थितांना कुठेही शिकार होणार नाही म्हणून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चा कायद्याची ओळख व माहिती देण्यात आली. आपल्या अस्तित्वासाठी लढत असलेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

          विविध वन्य जीव भ्रमण मार्गाजवळील शेवरे पाडा, धुपेमाय , नूर वस्ती , वरगव्हाण येथील नागरिकात शून्य सर्पदंश , मानव बिबट संघर्ष टाळणे , अस्वल अधिवास क्षेत्रात घ्यावयाची काळजी , वन्यजीव शिकार प्रतिबंध अधीनियम इ .विषयी मार्गदर्शन करणारे 400 पत्रकांचे वाटप करण्यात आले.


          @  अवैध वृक्ष व वन तोड तसेच वन्यजीव पशुपक्षी शिकार , त्यांचा अवयव व्यापार संबंधी माहिती असल्यास खालील संपर्क क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री हेमराज पाटील - सदस्य , वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग , दिल्ली 9922085434 , वनविभाग 1926  @

         यासाठी सहाय्यक वनसंरक्षक श्री प्रथमेश हाडपे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदस्य अश्विनी पाटील , घनश्याम वैद्य , अश्फाक पिंजारी , आर्यदीप पाटील ,पोलीस पाटील गणदास बारेला , प्रताप बारेला , रमेश बारेला , भावलाल बारेला , मिमाबाई बारेला यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp