चोपडा (प्रतिनिधी) : - -
जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमाचा घोळ हा आंबिया व मृग बहरात अश्या दोघे हंगामात समाविष्ट करून , घोळ लवकर मिटवा - - ना. अनिल पाटील यांना शेतकरी कृती समिती कडून निवेदन...
जळगाव जिल्ह्यात शेतकरी आता वर्षभर केळी लावतो व केळी पीक विमा फक्त आंबिया बहारात म्हणजे फक्त ऑक्टोबर मध्येच काढता येतो, यानेच केळी पीक विम्याचे सारे प्रश्न निर्माण झाले.
आंबिया बहार (कांदे बाग) ऑक्टोबर ते डिसेंबर या शेतकरी कालावधीत लागवड करतात व ते ही रोप व कंद असे दोन प्रकारे , जे कंद लावतात त्यांना उगवायला किमान एक महिना लागतो. पण पीक विमा काढण्याची मुदत 31 ऑक्टोबर त्या दिवशी शेतात जियो टॅग्गिंग ने फोटो कसा निघेल ? काही शेतकरी लागवड करायची असेल तर आधी पीक विमा भरून ठेवतात, पण चुकून त्यांचे लागवडीचे नियोजन चुकले तर मात्र पैसे वाया जातात व सरकारच्या नजरेत शेतकरी लबाड ठरतो.
31 ऑक्टोबर पूर्वीच आंबिया बहरात लागवड होते हा जावई शोध सरकार व पीक विमा कंपनी ने लावल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा योजना बाबत लावल्याने शेतकरी व जिल्हा बदनाम होत आहे. सबब केळी लावून देखील पीक विमा काढण्यापासून वंचित ठेवण्याचे धोरण सरकारचे दिसते.
केळीची आता वर्षभर लागवड केली जाते त्यामुळे तिचा डाळिंब व द्राक्ष या पिका सारखा दोघेही बहरात समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण खानदेशातील शेतकरी चा लढा कमी पडतो की काय ?अशी शंका शेतकऱ्यांना येते. आंबिया बहरात देखील केळी पीक विमा काढण्याचा कालावधी 31 डिसेंबर पर्यंत वाढवून मिळावा व गेल्या वर्षाच्या थकीत पीक विम्याचा प्रश्न तात्काळ मिटवावा अशी देखील मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी एस बी पाटील, राहुल सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, दिनेश पाटील, पंकज सोनवणे, ॲड कुलदीप पाटील हजर होते.
WhatsApp
No comments:
Post a Comment