चोपडा (प्रतिनिधी) : - -
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा मध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आंतरशालेय विविध क्रीडास्पर्धांमध्ये विशेष यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डाॅ. नरेंद्र मनोहर अग्रवाल आणि सपना निर्मल टाटिया यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. स्वागतगीतासाठी शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. डाॅ. नरेंद्र मनोहर अग्रवाल यांनी देखील विद्यार्थ्यांना आहार आणि खेळ यांविषयी मार्गदर्शन केले. सपना टाटिया यांनी विद्यार्थ्यांना खेळ आणि अभ्यास, आहार विहार यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
17 वर्षाखालील मुलांच्या गटात क्रिकेट या क्रीडा प्रकारात शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या खेळाडूंमध्ये प्रियांशू पाटील, मोहित पाटील, अनिकेत साळुंखे, प्रशांत महाले, जयेश पाटील, जयेश ठाकरे, अक्षय पाटील, देवांशू पाटील, धैरेश पाटील, सिद्धम जैन, अभिनव साळुंखे, सर्वेश सैंदाणे, यश पाटील, यश महाजन, पियुष पाटील आणि कौस्तुभ चौधरी यांचा समावेश होता.
17 वर्षाखालील मुलींचा क्रिकेटचा संघ देखील तालुका पातळीवर उपविजयी ठरला. यात अंजली पोळ, जिनिषा क्षीरसागर, स्पंदन सोनकांबळे, सुमेधा पाटील, अदिती शिंदे, रिधिमा सोनवणे, मितिक्षा अग्रवाल, प्राची धनगर, अनुष्का सुर्वे, राजवी सोनवणे, शार्ली महाजन, अनोशा सैय्यद या विद्यार्थिनींचा समावेश होता.
तालुका स्तरावर आयोजित केलेल्या कॅरमच्या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये जय विलास राणे आणि आर्या मनोहर सोनवणे हे विद्यार्थी विजयी झाले तर सतरा वर्षाखालील वयोगटामध्ये दिव्य हितेश जैन, दिवेश उमेश खाचणे, निशांत राजेश तायडे, सुमेधा अरुण पाटील, हंसिका मिलिंद पाटील, रिधिमा विजय सोनवणे हे विद्यार्थी विजयी झाले.
तालुका स्तरावर आयोजित केलेल्या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये शाळेतील संस्कृती बापूसाहेब शिंदे, मंजुश्री बापूसाहेब शिंदे या विद्यार्थिनी विजयी झाल्या. 17 वर्षाखालील वयोगटात हिरल चेतन ठक्कर, स्पंदन उत्तम सोनकांबळे, पूर्वी पवन अग्रवाल, भार्गवी योगेश पाटील, धैरेश प्रवीण पाटील, हार्दिक मनीष अग्रवाल हे विद्यार्थी विजय झाले.
तालुका स्तरावर आयोजित केलेल्या बॅडमिंटनच्या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये अनुष्का पाटील, प्रांजल शिरसाठ, आर्या सोनवणे, तनिष्का कोळी, वेदांत ठाकूर, रुपेश बाविस्कर, पार्थ कोळी, पारस पाटील, आदित्य पाटील हे विद्यार्थी उपविजेता ठरले. 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये जीनिशा क्षीरसागर, अंजली पोळ, भार्गवी पाटील, अनुष्का सुर्वे, प्रियांशू पाटील, हार्दिक अग्रवाल, लविश पालिवाल, दिवेश खाचणे आणि मोहित पाटील हे विद्यार्थी विजयी ठरले.
तालुका पातळीवर रिले रेस या क्रीडा प्रकारामध्ये प्रियांशू पाटील, यश पाटील, मोहित पाटील, सर्वेश सैंदाणे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. तर थाळीफेक या क्रीडा प्रकारात गार्गी नितीन चौधरी या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, शाळेतील क्रीडा शिक्षक पूजा चौधरी आणि भूषण गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील क्रिडाशिक्षिका पूजा चौधरी यांची खो खो या क्रीडा प्रकारासाठी राज्यस्तरीय पंच म्हणून नियुक्ती झाली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा शिक्षक पूजा चौधरी आणि भूषण गुजर यांचाही सत्कार करण्यात आला.
सर्व विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशाताई पाटील, सचिव डॉ. स्मिता सुरेश पाटील, समन्वयक एन. एस. सोनवणे, डी. एस. पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अश्विनी पाटील यांनी केले.
WhatsApp
No comments:
Post a Comment