जि. प. केंद्र शाळा दहिवद ता. अमळनेर येथे माजी विद्यार्थी अजय सपकाळेचा वाढदिवस साजरा , विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/10/2023

जि. प. केंद्र शाळा दहिवद ता. अमळनेर येथे माजी विद्यार्थी अजय सपकाळेचा वाढदिवस साजरा , विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप . . . .

 

अमळनेर (प्रतिनिधी) : - -

          जि. प. केंद्र शाळा दहिवद ता. अमळनेर येथे माजी विद्यार्थी अजय सपकाळेचा वाढदिवस साजरा , विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप . . . .

        दहिवद ता. अमळनेर येथील अजय सुनिल सपकाळे हा सर्व साधारण कुटुंबातील मुलगा जि. प. केंद्र शाळा दहिवद ता. अमळनेर येथे शिकून लहानाचा मोठा झाला या शाळेत मिळालेल्या छडी , संस्काराची व ज्ञानाच्या शिदोरीवर अजय आज रोजी विदेशात चांगल्या नोकरीवर आहे.

         घरी आपल्या गावी दहिवद येथे आला असताना त्याला आपल्या लहानपणीच्या शाळेची व आपल्या गुरुची आठवण यायला लागली. ज्या शाळेत मिळालेल्या ज्ञानावर आपण यशस्वी झालो व आज नोकरी साठी विदेशात पोहचलो त्या शाळेचे आपण देणे लागतो अशा भावनेने अजय ने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेत भेट देऊन तेथील विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्याचे ठरविले.

         अजय शाळेत गेल्यावर आपले गुरु रमेश पाटील यांना भेटला व आपला मनोदय सांगितला असता त्याचे गुरु रमेश यांना आपला विध्यार्थी आज विदेशात नोकरी करत आहे याचा त्यांना अत्यानंद झाला व आज त्याचा वाढदिवस आहे हे कळाल्यावर त्यांनी तिथेच वाढदिवस आपल्या सहकारी गुरुजी व विद्यार्थी सह वाढदिवस साजरा केला. गुरुजी तुम्ही दिलेली छडी व ज्ञानावर मी आज विदेशात नोकरीला आहे असे सांगितल्यावर गुरुजी रमेश पाटील यांना गहिवरून आले व अजय च्या इच्छेखातर त्यांनी त्याला एक छडी ही मारली. व जीवनात अजून यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला.


           अशा उल्लाहासात व जल्लोषात सर्व सहकारी शिक्षक - शिक्षिका व विध्यार्थ्यांन सह अजय चा वाढदिवस व अजय तर्फे सर्व विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अजयचे गुरु रमेश पाटील त्यांचे सहकारी शिक्षक - शिक्षिका व विध्यार्थी पालक व गावातील नागरिक हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp