चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा येथील दोन्ही बंधु तैवान येथे पिकलबॉल स्पर्धेसाठी इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना.....
चोपडा येथील पाटील गढी खाईवाडा रहिवासी श्री रवींद्र नारायण महाजन व सौ मायाताई रवींद्र महाजन (पिग्मी एजंट) यांचे सुपुत्र चि.तेजस महाजन व चि.कुलदीप महाजन हे दोन्ही बंधू पिकलबॉल स्पर्धे निमित्त इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी "तैवान" येथे रवाना झालेली आहे. विशेष म्हणजे याआधी सुद्धा या दोन्ही बंधूंनी नांदेड, बेंगलोर,उत्तराखंड, इंदौर, नोएडा, नेपाळ, थायलंड, इंडोनेशियातील बाली, अशा विविध ठिकाणी स्पर्धक म्हणून विविध मेडल व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मिळालेली आहे. पिकल बॉल खेळाच्या निमित्ताने वारंवार ही संधी या बंधूंना मिळत असते. चि. तेजस व कुलदीप यांना पिकलबॉल या खेळासाठी अरविंद प्रभू सर (विलेपार्ले मुंबई ) यांचे नेहमी मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
चि.तेजस व चि. कुलदीप हे सर्वसामान्य परिवारातील असून उच्चशिक्षित सुद्धा आहेत तसेच एक सुसंस्कारित कुटुंब म्हणून या परिवाराची अगदी वेगळी ओळख समाजात आहे. यांच्या या खेळाचे निमित्ताने समाजातील सर्व मान्यवर परिवारातील नातलग तसेच मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment