अमळनेर सत्र न्यायालयात बाल लैंगीक गुन्हयातील दाखल आरोपी अविनाश धनगर यास 15 वर्ष सश्रम कारावास - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

06/11/2023

अमळनेर सत्र न्यायालयात बाल लैंगीक गुन्हयातील दाखल आरोपी अविनाश धनगर यास 15 वर्ष सश्रम कारावास

 

चोपडा (प्रतिनिधी) : - 

          अमळनेर सत्र न्यायालयात बाल लैंगीक गुन्हयातील दाखल आरोपी अविनाश धनगर यास 15 वर्ष सश्रम कारावास 

         चोपडा शहरात राहणारी अल्पवयीन मुलगी वय 17 वर्ष। महिना 26 दिवस हिला आरोपी अविनाश सुरेश धनगर वय 22 रा भावेर ता. शिरपुर याने अपहरण करून तीला रोहीणी भोईटी, मानपुर (मप्र). सुन्द्रेल, ओकांरेश्वर याठिकाणी घेवुन गेला व सदर पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिचेसोबत लैगींक अत्याचार केला.

          पिडीत मुलीच्या पालकांनी चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरन 412/2021 भादवि कलम 363, 376 (1) (A) 2 (N) 366 अ सह बालकांचे लैंगिक गुन्हयापासुन संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 5 (L) 12 प्रमाणे दिनांक 16/12/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

         सदर गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रीक बाबींचे विश्लेषण करुन गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांना ओकारेश्वर मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले होते. नमुद आरोपीस गुन्हयाकामी अटक केल्या नंतर गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि अजित सावळे यांनी गुन्हयामध्ये परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे कडे कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीचे विरुध्द मा. अतिरिक्त सत्र न्यायालय अमळनेर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

         सदर गुन्हयाची सुनावणी मा. श्री पी. आर चौधरी जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायालय अमळनेर यांचे न्यायालयात करण्यात आली. न्यायालयात सदर गुन्हयाची सुनावणी पुर्ण होवुन दिनांक 06/11/2023 रोजी सदर खटल्यात आरोपी अविनाश सुरेश धनगर वय 22 रा. भावेर ता. शिरपुर याचे विरुध्द भादवि कलम 363 कलमान्वये 5 वर्ष तसेच बालकांचे लैगींक अपराधापासुन संरक्षण कायदा 2012 चे 4 व 12 मध्ये 10 वर्ष अशी एकुण 15 वर्ष सश्रम कारावासी शिक्षा ठोठावण्यात आली.

          सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोहेकॉ प्रदीप राजपुत यांनी केला असुन पुढील तपास सपोनि अजित सावळे यांनी केला. तसेच सदर खटल्याचे कामकाज सरकार तर्फे सरकारी वकील श्री. राजेद्र बी चौधरी यांनी पाहीले असुन पैरवी अधिकारी म्हणुन पोकॉ नितिन कापडणे यांनी कामकाज केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp