Post Top Ad
Responsive Ads Here
10/11/2023
Home
Unlabelled
ऍड.संजय जैन यांची पुणे विमानतळ प्राधिकरणावर सल्लागार म्हणून नियुक्ती
ऍड.संजय जैन यांची पुणे विमानतळ प्राधिकरणावर सल्लागार म्हणून नियुक्ती
चोपडा तालुक्याचे भूमिपुत्र, घोडगाव गावाचे सुपुत्र ज्यांनी आपल्या उद्योग व्यवसायात प्रचंड यश कमवीत चोपडा तालुक्याचे नाव मोठं केलं आहे. ऍड.संजयभाऊ जैन यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे. संजयभाऊ यांची नुकतीच पुणे येथील विमानतळाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री ना. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही नियुक्ती केली आहे.
ऍड.संजयभाऊ जैन यांच्या कामाची, कार्याची दखल घेत काही महिन्यांपूर्वीच त्यांची भारत सरकारच्या वतीने केंद्रीय रल्वे बोर्डाच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक या तीन राज्यांच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली होती. त्यात आज पुन्हा दिवाळी आधीच ही गोड बातमी आल्याने चोपडा तालुका वासियांची छाती गर्वाने, अभिमानाने फुलली आहे. सद्य स्थितीत पुणे येथील पुरंदरे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य विमानतळाचे कार्य सुरू असून अशातच संजयभाऊ यांची झालेली ही निवड संजय जैन यांच्या कार्याची पावती आहे. ऍड. संजय जैन यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजाच्या सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment