महाराष्ट्र घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न झाल्यास 28 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचे गट विकास अधिकारी यांना प. स. चोपडा यांना निवेदन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/11/2023

महाराष्ट्र घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न झाल्यास 28 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचे गट विकास अधिकारी यांना प. स. चोपडा यांना निवेदन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           महाराष्ट्र घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न झाल्यास 28 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचे गट विकास अधिकारी यांना प. स. चोपडा यांना निवेदन 

          ग्रामीण गृहनिर्माण योजना शसनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस झटून वेळेत काम करणाऱ्या राज्य स्तरीय, विभाग स्तरीय, जिल्हा स्तरीय प्रोग्रामर व तालुका स्तरीय ऑपरेट तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरकुल योजना - ग्रामीण च्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी मुळ मानधनामध्ये वाढ करणे व मागण्या पुर्ण करणेबाबत मा. प्रधान सचिव ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई निवेदन दिले आहे.

          त्याअनुषंगाने गट विकास अधिकारी पंचायत समिती चोपडा आर. ओ. वाघ यांना तालुका घरकुल संगणक ऑपरेटर चंद्रकांत बडगुजर यांनी 21 नोव्हेंबर 2023 ला संगटनेचे निवेदन दिले. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जलगाव यांना सुध्दा जिल्हास्तरीय प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले आहे. केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपुर्ण काम राज्य स्तर, विभाग स्तर, जिल्हा स्तर प्रोग्रामर व तालुका स्तर ऑपरेटर गेल्या कित्येक दिवसापासून करत आहेत.


          सर्व कर्मचारी यांचा अनुभव व वय बघता जॉब सुरक्षा बाबत विचार व्हावा व वयाच्या 58 वर्ष पर्यंत नोकरीची हमी मिळावी, ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन व इतर सर्व विभामध्ये ज्याप्रमाणे HR Policy लागू केलेल्या आहे त्या सर्व आम्हाला तात्काळ लागू करून मिळाव्यात, मुळ मानधामध्ये एकुण 30 टक्के मानधन वाढ करावी, महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन मिळावे, CSC e-Governance संस्थेमार्फत प्राप्त होणारे मासिक मानधन तपशील पाहता एकुण मुळ मानधनातून Gratuity , ESIC , Pf , यांची मासिक रक्कम कपात केली जाते यांच्या मासिक मुळ माधनातून Pf , Gratuity , ESIC कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी, शसकीय भरतीमध्ये आरक्षीत राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या.

         सदरील मागण्याबाबत सकारात्मक प्रतीसादर न मिळाल्यास 28 नोव्हेंबर 2023 पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल व महाराष्ट्र राज्यात घरकुल योजना - ग्रामीण चे कामकाज बंद करावे लागेल असे कळविले आहे. याबाबत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यावर निवेदन दिलेले आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp