अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन - तहसीलदारांना निवेदन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/11/2023

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन - तहसीलदारांना निवेदन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन - तहसीलदारांना निवेदन 

        अवकाळी पावसाने नुकसान  झालेल्या कापूससह साऱ्याच पिकांचा पंचनामा न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन.... जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येते तेव्हा तेव्हा शासन सुलतानी आदेश काढते व शेतकऱ्यांना मदती पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

         कापूस लागवडीचे आदेशानेच जून मध्ये शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली, तरी देखील बोंड अळी पडली, शासन गप्प, फक्त 21 दिवस सलग खंड नाही म्हणून पीकविमा चे ट्रिगर लागू नाही. कापूस उशिरा पेरणी केल्याने आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस शेतात उभा असून अवकाळीने तो खराब झाला. पीक विमा कंपन्या कडे फोन केले असता पोस्ट हार्वेस्टिंग चे नावाने ते तक्रार घेत नाहीत, अतिवृष्टी नसल्याने सरकार पंचनामा टाळत आहे, अवकाळी त अतिवृष्टी चा काय संबंध ? आता शेतकऱ्यांनी कुठे जावे ? जिल्ह्यात वजनदार तीन तीन मंत्री , त्यात मदत व पुनर्वसन मंत्री तरी शेतकऱ्यांचा पंचनामा होत नसेल तर मदत कशी मिळेल. त्याच्या नुकसानीचा पंचनामा होऊन त्याला मदत मिळणे गरजेचे आहे. तो न झाल्यास शेतकरी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

          शासनाच्या वतीने शिंपी यांनी निवेदन स्वीकारले त्यावर एस बी पाटील, डॉ रवींद्र निकम, पांडुरंग पाटील, धीरज पाटील, कुलदीप पाटील, कमलाकर पाटील, प्रमोद बोरसे यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp