भारतीय जैन संघटनेच्या तर्फे भाऊबीज व दीपक चोपडा यांच्या वाढदिवसा निमित्त फराळ वाटप - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/11/2023

भारतीय जैन संघटनेच्या तर्फे भाऊबीज व दीपक चोपडा यांच्या वाढदिवसा निमित्त फराळ वाटप


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

           भारतीय जैन संघटनेच्या तर्फे भाऊबीज व दीपक चोपडा यांच्या वाढदिवसानिमित्त फराळ वाटप

         चोपडा येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने असाह्य व गरीब विध्यार्थ्याना भाऊबीज व संघटनेचे राज्य सचिव दिपक चोपडा यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई व फराळ वाटप करण्यात आले. 

         सविस्तर असे की, येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने असाह्य व गरीब विध्यार्थ्याना भाऊबीज निमित्त फराळ वाटप करायचे आहे असे आवाहन सोशल मीडियावर केले होते. त्या आवाहन वरून समाजातील अनेक दानदात्यांनी भारतीय जैन संघटनेवर विश्वास ठेवत आर्थिक मदत केली सामाजाच्या सहकार्याने भारतीय जैन संघटना असा कार्यक्रम घेत असते. जवळपास 200 परिवारा पर्यंत मिठाई व फराळ संघटनेने पोहचवली.

         यावेळी उघड्यावर असलेले निरागस मुलांना फराळ भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्या सारखा होता. त्यामुळे संघटनेच्या सदस्यांचे देखिल चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तसेच बारामती अग्रो च्या ऊस तोड कर्मचाऱ्यांना देखील मिठाई व फराळ वाटप करण्यात आले.

          यावेळी बारामती ऍग्रोचे मुख्य शेतकी अधिकारी आर. व्ही. देसले, सुपरवायझर श्रीराम पाटील, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव कोचर, कोष्याध्यक्ष अभय ब्रम्हेचा, जेष्ठ सदस्य दिनेश लोडाया, विपुल छाजेड, चेतन टाटीया, आदेश बरडीया, विभागीय उपाध्यक्ष लतीश जैन आदि हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp