पक्षी व वन्यजीव ग्रंथ प्रदर्शन आणि पक्षी निरीक्षण करून पक्षी सप्ताह उत्साहात साजरा - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/11/2023

पक्षी व वन्यजीव ग्रंथ प्रदर्शन आणि पक्षी निरीक्षण करून पक्षी सप्ताह उत्साहात साजरा


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पक्षी व वन्यजीव ग्रंथ प्रदर्शन आणि पक्षी निरीक्षण करून पक्षी सप्ताह उत्साहात साजरा

          दि.5 नोव्हेंबर थोर निसर्ग लेखक , अरण्यऋषी श्री मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन व 12 नोव्हेंबर द बर्ड मॅन ऑफ इंडिया डॉ. सालीम अली यांची जयंती अर्थातच पक्षी सप्ताह. या कालावधीत महाराष्ट्र राज्यात वनविभाग व निसर्गप्रेमी पक्षी अभ्यासकांकडून पक्षी सप्ताह यावर्षी देखील साजरा करण्यात आला. चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचा दि.5 नोव्हेंबरला तृतीय वर्धापन दिन निमित्ताने पक्षी व वन्यजीव विषयक ग्रंथ - संपदेचे पूजन करून पक्षी सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.

         नोव्हेंबर महिना म्हणजे हिवाळ्याच्या आगमनाबरोबर उत्तर गोलार्धातील अनेक देशातून हंगामी स्थलांतर करणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांचा आगमनाचा कालावधी असतो. पक्षी सप्ताहात चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेकडून शहरी भागात अर्बन पॅच बर्डिंग व सातपुड्यात 64 पक्षी प्रजातींच्या नोंदी व छायाचित्रण करण्यात आले. यात प्रामुख्याने रेड वेंटेड बुलबुल , यलो फुटेड ग्रीन पिजन , ब्ल्यू रॉक थ्रश , कॉलर डव्ह, स्पॉटेड डव्ह , ड्रॉंगो, डॉ. सालीम अली स्पेरो , सनबर्ड , आयोरा , किंगफिशर , कारमोरंट , ग्रे हेडेड कॅनरी फ्लाय केचर , व्हाईट बेलीड ड्रॉंगो, रेड ब्रेस्टेड फ्लाय केचर , सिनेरस टीट, ब्राऊन रॉक चॅट , व्हाईट आय बजार्ड , शिक्रा , ब्लॅक काईट , पीपीट , सल्फर बेलीड वॉर्ब्लर , बुटेड वॉर्ब्लर इ .पक्षी प्रजाती आढळून आल्या.

          यावेळी पक्षी व वन्यजीव विषयक 51 विविध ग्रंथसंपदा व मासिकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विवेकानंद विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या पक्षी प्रेमी विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण व ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील सामान्य पक्ष्यांची माहिती व ओळख पक्षी अभ्यासक श्री हेमराज पाटील यांनी करून

दिली.

         पक्षी सप्ताहातील विविध उपक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी पाटील , आर्यदीप पाटील , अनुसया जोशी , कृष्णप्रिया पाटील , सार्थक दीक्षित , धनंजय बागुल , जयेश बडगुजर , अमोल डुडवे यांनी परिश्रम घेतलेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp