पंकज बोरोले यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव ... वाढदिवसा प्रित्यर्थ सामाजिक उपक्रमांचे आयोजन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/12/2023

पंकज बोरोले यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव ... वाढदिवसा प्रित्यर्थ सामाजिक उपक्रमांचे आयोजन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           पंकज बोरोले यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव ... वाढदिवसा प्रित्यर्थ सामाजिक उपक्रमांचे आयोजन.... 

         पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवस निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .

          कर्तृत्व आणि दातृत्वाचा अनोखा संगम म्हणजे पंकज बोरोले. संस्थेतील कर्मचारी राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. निधनापूर्वी त्यांनी स्वतःचे घर असावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण स्वतःचे घर असावे ही त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा आज आपल्या वाढदिवशी पंकज बोरोले यांनी राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांच्या पत्नी रुपाली अत्तरदे यांना 15 लाख रुपये किमतीच्या फ्लॅटची चावी देत फ्लॅट बक्षीस स्वरूपात देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली. तसेच रुपाली अत्तरदे यांना पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू करून घेतले. सदर प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले. राजेंद्र अत्तरदे यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

         पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. सुरेश बोरोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वतः पंकज बोरोले व दिपाली बोरोले यांनी रक्तदान केले. 96 रक्तदात्यांनी नोंदणीकरण केले. सदर कार्यक्रम आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर आर अत्तरदे , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय के. पाटील,डाॅ.नंदिनी वाघ व विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. अजय पाटील,प्रा.दिपक देवरे तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्त केंद्राचे सुनील माळी व किरण लोहार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी  मेहनत घेतली.

          सकाळी 6 वाजता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेत 400 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. बोरोले यांनी देखील सहभाग नोंदवला.

         दि. 6 ते 11 डिसेंबर दरम्यान पंकज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . त्यात 16 संघ सहभागी झाले होते. दि. 11 डिसेंबर रोजी प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यासाठी एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

          दि. 13 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता  प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp