चोपड्यात राजहंस व कलहंसांचे प्रथमच दर्शन ; पक्षी निरीक्षकांच्या आनंदाला उधाण... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/12/2023

चोपड्यात राजहंस व कलहंसांचे प्रथमच दर्शन ; पक्षी निरीक्षकांच्या आनंदाला उधाण...


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपड्यात प्रथमच आढळून आलेल्या हंसांचे दर्शन झाल्याने पक्षी निरीक्षकांच्या आनंदाला उधाणच आले ....

         चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे प्रति वर्षाप्रमाणे अति थंडीच्या मोसमात सातपुडा व परिसरातील लघु व मध्यम जलाशयांचे सर्वेक्षण करून आशियाई पाणपक्षी प्रगणना करण्यात येते. परिसरातील पावसाच्या पाण्याने हंगामी भरणाऱ्या खदानीच्या पाणथळीवर दि. 5 डिसेंबरला येथील पक्षी अभ्यासक हेमराज पाटील व अश्विनी पाटील यांना युरोपातील रोमानिया , तुर्की ते मध्य आशियातील चीन , मंगोलिया देशात विण असलेले राजहंस ( पट्ट कादंब ) एक व तीन कलहंस जलाशयावर मुक्तपणे विहार करताना आढळून आलेत. चोपड्यात प्रथमच आढळून आलेल्या हंसांचे दर्शन झाल्याने पक्षी निरीक्षकांच्या आनंदाला उधाणच आले. त्यानंतर मनसोक्त छायाचित्रण करून नोंदी घेण्यात आल्या. त्याचबरोबर सदस्यांनी व परिसरातून जाणाऱ्या इतर शेतकरी बांधवांनी दुर्बिणीतून हंसांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

    $ पक्षी प्रजातींच्या सचित्र नोंदणींचा चढता आलेख $

         दोन्ही हंसांच्या प्रजातींसह अद्याप पर्यंत चोपडा तालुक्यात तापी नदी पात्र ते सातपुडा वनक्षेत्रात 229 पक्षी प्रजातींच्या नोंदी संस्थेद्वारा घेण्यात आल्या आहेत. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल वन विभाग चोपडाचे सहाय्यक वनसंरक्षक पी व्ही हाडपे साहेब , सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी तसेच बी एन एच एस , मुंबईच्या पक्षी शास्त्रज्ञांनी अभिनंदन केले आहे.

        @ राजहंस पक्ष्याची माहिती @ 

        पक्षी वर्गातील अँन्सरीफॉर्मिस गणातील एनाटीडी कुळातील असून इंग्रजी नाव बार हेडेड गूज तर शास्त्रीय नाव अँन्सर इंडिकस असे आहे. या पक्ष्याच्या मानेच्या उतारावर असणारे दोन रुंद काळे पट्टे हा पक्षी ओळखण्याची खास खूण. पांढरे डोके , पिसे राखाडी , पंखावर काळसर रेषा , टोकावर काळा ठिपका व चोच नारंगी - पिवळी , पाय गर्द पिवळे , लांबी 75 से.मी., वजन दोन ते सव्वा तीन किलो असते. उत्तरेकडील मध्य आशियाई देशातून भारतीय उपखंडात हंगामी स्थलांतर करताना हे पक्षी 27 ते 29 हजार फूट उंचावरून उडत प्रवेश करतात. या कालावधीत अन्नाची गरज आणि अनुकूल हवामानाची उपलब्धीसाठी स्थलांतरित पक्षी गोड्या पाण्याचे जलाशय , नदी , सरोवर , धान्याची शेती , गवती कुरणाजवळ वास्तव्य करतात.

          @ कलहंस पक्ष्याची माहिती @

        पक्षी वर्गातील अँन्सरीफॉर्मिस गणातील एनाटीडी कुळातील असून इंग्रजी नाव  ग्रे लॅग गूज तर शास्त्रीय नाव अँसर अँसरअसे आहे. करड्या रंगाची पुठ्ठ्याकडील बाजू , गुलाबी रंगाची मांसल  चोच व त्यावरील सफेद कडा ही या हंसाची खास ओळख. आकाराने मोठा , गुलाबी मोठे पाय , धूसर राखाडी मान व डौलदार छाती , लांबी 81 से.मी. वजन सरासरी सव्वा तीन किलो पेक्षा जास्त. युरोपातील रुमानिया , तुर्की व पूर्व आशियातून सात हजार मिटर उंचावरून पक्षी स्थलांतराच्या मध्य आशियाई मार्गाने उड्डाण घेतात. पंखांचा विस्तार 147 ते 180 से.मी. हंगामी जलाशय , नद्या , मोठाले झील , धानाची शेती जवळ यांचे वास्तव्य असते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp