पंकज बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त प्लास्टिक मुक्त अभियान . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/12/2023

पंकज बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त प्लास्टिक मुक्त अभियान . . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पंकज बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त प्लास्टिक मुक्त अभियान . . . .

         पंकज शैक्षणिक सामाजिक संस्था व पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त दि. 11 डिसेंबर रोजी प्लास्टिक मुक्त परिसर स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

       सदर उपक्रमाचे उद्घाटन चोपडा नगरपरिषदचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते धनवाडी फाटा येथे सकाळी 7 : 30 वाजता होणार आहे. 

          सदर कार्यक्रमास पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले,  उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले , नारायण बोरोले, गोकुळ भोळे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. 

        आज जगासमोर प्लास्टिकची प्रचंड मोठी समस्या निर्माण झालेली आहे. दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून परिसरातील प्लास्टिक कचरा वेचून त्याचे संकलन करण्यात येणार आहे. वेचलेल्या कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट देखील लावण्यात येणार आहे.

         प्लास्टिक मुक्त परिसर अभियानास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्लास्टिक मुक्त परिसर करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थे तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp