चोपडा शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावण्यात याव्या - मनसेचे तहसीलदार ; न. पा. मुख्याधिकारी ; पो. नि. यांना निवेदन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/12/2023

चोपडा शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावण्यात याव्या - मनसेचे तहसीलदार ; न. पा. मुख्याधिकारी ; पो. नि. यांना निवेदन

चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावण्यात याव्या - मनसेचे तहसीलदार ; न. पा. मुख्याधिकारी ; पो. नि. यांना निवेदन 

         चोपडा शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावणे बाबत नुकत्याच लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार दुकाने तसेच आस्थापनांवर मराठीत नामफलके लावण्याची मुदत 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत होती. मुदत संपली असून अद्यापही आपल्या कार्यक्षेत्रातील शहरातील काही दुकाने तसेच विविध आस्थापनांवर मराठीत नामफलकाच्या पाट्या लावण्यात आलेल्या नाही, असे आमच्या निदर्शनास आले आहे. तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आपणास विनंती करितो कि, आपण तातडीने अश्या दुकानांचे तसेच आस्थपानांचे सर्व्हेक्षण करून सूचना तसेच दंडात्मक कारवाईच्या नोटीसा देण्यात याव्यात जेणे करून कुठेच कोर्टाने दिलेल्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. 

         महाराष्ट्रात सर्व दुकानांवर व आस्थापनांवर मराठीत नामफलकाची पाटी लागलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कायमच राहिली आहे. तरी याला जोड म्हणून आता सुप्रीम कोर्टानेच आदेश दिला आहे तरी आपण तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठी पाट्या लावण्या संदर्भात आंदोलन छेडण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.

          निवेदनावर मनसे माजी जिल्हाध्यक्षअनिल वानखेडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश भाऊ पवार, तालुका उपाध्यक्ष सतीश करनकाळ, दिपक पाटील, शहराध्यक्ष निलेश बारी, विभाग अध्यक्ष मनोज पाटील, चेतन पवार, चिरंजीव भोई, जयेश बोरसे, चैतन्य पाटील, सागर वसाने, भावेश पवार, हर्षल महाजन,अनिकेत सोनगीरे, मयूर महाजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp