डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा .... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

22/12/2023

डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा ....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा ....

         महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय चोपडा, तर्फे दि. 22 / 12 / 2023 रोजी ‘राष्ट्रीय गणित दिवसाच्या’ निमित्ताने मानवंदना थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना अर्पण करण्यात आली. 

            श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्ताने गणितीय रांगोळी स्पर्धा व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील व प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य श्री. एस. पी. पाटील, पर्यवेक्षक श्री ए. एन. बोरसे, समन्वयक श्री. पी. एस. पाडवी व गणित विभागाच्या सौ. एस. झेड. सय्यद, श्री एस. एस. जैन व श्री जे. जे. पाटील उपस्थित होते. तसेच गणितीय रांगोळी स्पर्धेत एकूण 11 विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला. त्यात प्रथम क्रमांक कु. राणी प्रवीण पाटील, द्वितीय क्र. खुशी भगवान चौधरी व तृतीय क्र. नेहा नरेंद्र पाटील यांनी मिळवीला. तसेच वकृत्व स्पर्धेत एकूण 10 विद्यार्थिनीनी सहभाग नोंदविला तसेच इ. 12 वी चा विद्यार्थी चि. यशोदीप रविंद्र पाटील याने श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर PPT सादर केली. वकृत्व स्पर्धे नंतर मा. प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याना गणित विषयाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले. त्या नंतर कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य श्री. एस. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांन मध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करण्या साठी प्रोत्साहित केले. 

          राष्ट्रीय गणित दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इ. 11 वी च्या विद्यार्थीनी कु. खुशबू जैन, कु. प्रज्ञा विसपुते व स्नेहा सोनवणे यांनी केले. व आभार प्रदर्शन श्री. जे. जे. पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक श्री. एन. बी. शिरसाठ, श्री. एस. टी. शिंदे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज