पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

21/12/2023

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल  येथे सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा ....

          येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल रेजोनन्स 2023 कार्यक्रमात रामायण या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने व त्यांच्या कलाकृतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. या प्रयोगासाठी क्रेन, घोडा गाडीचा उपयोग करण्यात आला. अखंडित असा कार्यक्रम घेऊन पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले.

         या महानाट्य मध्ये एकूण 380 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून दोन तास पंधरा मिनिटे अखंडित चालणाऱ्या या महानाट्याने सर्व प्रेक्षकांना प्रभावित केले. विद्यार्थ्यांची रंगभूषा व सादरीकरण बघून सर्व प्रेक्षक वर्ग अचंबित व आश्चर्यचकित झाले. या दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा येथील माजी आमदार कैलास पाटील हे उद्घाटक म्हणून पहिल्या दिवशी लाभले. दुसऱ्या दिवशी चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले हे होते .

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपेश चव्हाण यांनी अथक परिश्रम केले, या महानाट्याचे प्रमुख ललित सोनवणे व स्वाती सोनवणे यांनीही प्रयत्न केले. या महानाट्यानंतर पालकांच्या उत्सुकत प्रतिक्रिया मिळत आहेत. दोन दिवशीय कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील सर यांनी केले

         सदर कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून विविध शाळेचे संस्थापक अध्यक्ष व सीबीएसई शाळेचे प्राचार्य उपस्थित होते. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विभाग प्रमुख डॉ आर. आर अत्तरदे, व्ही. आर. पाटील,  एम. व्ही. पाटील, केतन माळी, रेखा पाटील यांची उपस्थिती होती. संचालक  नारायण बोरोले, पंकज बोरोले, गोकुळ भोळे, अविनाशजी राणे हे उपस्थित होते. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमास दोन्ही दिवशी मोठ्या संख्येने पालकांची अविस्मरणीय उपस्थिती होती.

         पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूलचे चेअरमन सुरेंद्र बोहरा तसेच मुख्याध्यापिका शोभा सोहनी, जळगाव येथील ओरिएंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा कांची, शिरपूर येथील अमरीश आर. पटेल, सीबीएससी स्कूलचे प्राचार्य निच्छल नायर, के व्ही टी आर चे प्राचार्य निलेश चोपडे, पोदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव चे प्राचार्य गोकुळ महाजन, एस आर बी इंटरनॅशनल स्कूल दहिवद येथील चेअरमन धीरज बाविस्कर, इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल पाळधीचे चेअरमन नरेश चौधरी, इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, टायगर इंटरनॅशनल स्कूल पारोळा येथील अध्यक्ष रवींद्र पाटील व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

      महानाट्यामध्ये पालकांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज