ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्यमंत्री संदेश पत्रिकेचे वाचन आणि बालिका दिनाचे उत्साहात आयोजन ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/01/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्यमंत्री संदेश पत्रिकेचे वाचन आणि बालिका दिनाचे उत्साहात आयोजन ...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम  स्कूलमध्ये मुख्यमंत्री संदेश पत्रिकेचे वाचन आणि बालिका दिनाचे उत्साहात आयोजन ...

         चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुख्यमंत्री संदेश पत्रिकेचे वाचन व वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संदेश पत्रिकेचे सामुदायिक वाचन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'  स्पर्धात्मक अभियान, 'वाचन महोत्सव', 'माझी शाळा, माझी परसबाग', 'स्वच्छता मॉनिटर टप्पा - २' , 'दत्तक शाळा योजना', ' शासन आपल्या दारी' या नवनवीन उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांना या पत्रिकेद्वारे माहिती मिळाली. उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येणार आहेत. शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी, इंग्लिश लैंग्वेज लॅब, रोबोटिक लॅब उभारून शिक्षणाच्या अद्ययावत संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती विद्यार्थ्यांना संदेश पत्रिकेद्वारे देण्यात आली. आरोग्यदायी सुदृढ समाज घडवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

       सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, आणि समन्वयक दिप्ती पाटील, अश्विनी पाटील, सुचिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील शिक्षक जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बालपणापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या विविध प्रसंगांविषयी विस्तृत माहिती  दिली. सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य समजावून सांगितले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि त्यांनी केलेले समाजकार्य यांची देखील सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp