Post Top Ad
Responsive Ads Here
11/01/2024

Home
Unlabelled
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न . . . .
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न . . . .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. स्वागतगीत आणि गणेश वंदना सादर करण्यात आली. याप्रसंगी डॉ. प्रदीप लासुरकर ( तालुका हेल्थ ऑफिसर, चोपडा), संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, स्नेहा पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. सोनाली बारेला, डॉ. अतुल पाटील, डॉ. पराग पाटील, डॉ. अमोल पाटील, अनिल पाटील, नितीन जैन, नरेंद्र तोतला, विनोद टाटिया, ज्योती टाटिया, तुळशीराम पाटील, गणेश पाटील, गणेश बुआ (ए.पी.आय. अडावद), प्रा. दीनानाथ पाटील, प्रा. डी.जी.सोमानी,शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस. सोनवणे, प्रा. विलास दारुंटे, प्रा. अशोक साळुंखे यांचे देखील सहकार्य लाभले. चोपडा तालुक्याचे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर अविनाश सदाशिव पाटील आणि संस्थेच्या उपाध्यक्षा आशाताई पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल, दीप्ती पाटील, कल्पना बारी, जयश्री सूर्यवंशी, अश्विनी पाटील, विशाल मराठे आणि सारिका पवार या शिक्षकांनी व इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वरांगी अहिरे आणि वैशाली गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांनी विविध नृत्य प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत गीतासाठी शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Share This

About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment