लाचेची नशा झाली जीवनाची दुर्दशा ! ! देवगाव ग्रामसेवक हेमचंद्र सोनवणे वर गुन्हा दाखल.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

31/01/2024

लाचेची नशा झाली जीवनाची दुर्दशा ! ! देवगाव ग्रामसेवक हेमचंद्र सोनवणे वर गुन्हा दाखल....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

              लाचेची नशा झाली ; जीवनाची दुर्दशा ! ! !

         देवगाव ग्रामसेवक हेमचंद्र सोनवणे वर गुन्हा दाखल....

        धानोरा ता. चोपडा तेथील रहिवासी तक्रारदार यांचे पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.

         त्याप्रमाणे यातील ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे , वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी , ग्रामसेवक देवगांव, पारगाव रा. चोपडा ता. चोपडा  जि.जळगांव यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला /बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे 7500 /- रुपयांची लाचेची मागणी केली. आज दिनांक 31 / 1 / 2024 रोजी पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता. तडजोडी अंती त्यांना 5000 /- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशन ता. चोपडा जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

      सापळा यशस्वी कमी तपास अधिकारी श्री. सुहास देशमुख , पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. जळगांव. यांच्या सह सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे , पोशी. राकेश दुसाने यांच्या सोबत कारवाईत एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक स.फौ. सुरेश पाटील , पो.ह. रविंद्र घुगे, मपोहेकॉ. शैला धनगर , पो.ना. किशोर महाजन , पोना सुनिल वानखेडे , पो.कॉ. प्रदीप पोळ , पो.कॉ. पो.कॉ. प्रणेश ठाकुर , पोशी अमोल सूर्यवंशी यांनी कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज