पत्रकारिता शोध व बोधाची असली पाहिजे ; दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वतंत्र स्तंभ निर्माण केला - अरुणभाई गुजराथी - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

06/01/2024

पत्रकारिता शोध व बोधाची असली पाहिजे ; दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वतंत्र स्तंभ निर्माण केला - अरुणभाई गुजराथी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         पत्रकारिता शोध व बोधाची असली पाहिजे ; दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वतंत्र स्तंभ निर्माण केला -  अरुणभाई गुजराथी

        लोकशाहीचे चार स्तंभ असतात परंतुु दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्वतःच्या बळावर एक वेगळा स्तंभ निर्माण केला पत्रकार शिवाय समाज व सरकार चालू शकत नाही पत्रकारांनी स्वरयुक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम केले पाहिजे जनतेला काय पार्लमेंटला कळतं त्यात पत्रकाराची भूमिका फार मोठी असते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी येथे केले .

         आज पत्रकार दिन 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चोपडा शहरातील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अरुणभाई गुजराथी बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, पत्रकारची समाजाला गरज असून प्रामाणिकता विश्वासहार्यता त्याच्या पत्रकारितेत पाहिजे, पत्रकारिता शोध व बोधाची असली पाहिजे, संसदेत 160 खासदारांचे  निलंबन झाले त्याविषयावर प्रिंट मीडियाने फारशी दखल घेतली नाही. राजकारणात आयाराम गयाराम असं म्हटलं जातं हा शब्द मला खटकतो म्हणून हा शब्द बदलण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. समाजात योग्य ते अनुषंगिक असं शब्दांचं महत्त्व निर्माण केलं पाहिजे. " NEWS म्हणजे काय " N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट व S म्हणजे साउथ चारी दिशांची माहिती म्हणजे NEWS असा याचा अर्थ होतो म्हणून पत्रकारांनी चौकस भूमिका घेऊन पत्रकारिता केली पाहिजे. असेही यावेळी अरुणभाई गुजराथी यांनी बोलतांना सांगितले....

         प्रास्ताविक पत्रकार रमेश पाटील यांनी केले यावेळी पत्रकार अनिल पालीवाल, संजय सोनवणे, श्याम जाधव, सचिन जयस्वाल, विनायक पाटील तसेच राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी बाळशास्त्रींना अभिवादन केले. आभार छोटू वारडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज