चोपड्यात शहरात शिवजन्मोत्सवा निम्मित प्रतापगड किल्ल्याचा देखावा ;
शिवजन्मोत्सवा उत्साहात साजरा होणार . . . .
चोपडा शहरात सालाबाद प्रमाणे यंदा देखील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या जयंतीचा ऐतिहासिक सोहळा सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात उद्या दि. 19 फेब्रुवारी सोमवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या प्रताप गड किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला आहे. तालुक्यातील जनतेला प्रत्यक्षात छत्रपतींचा इतिहासात जवळून बघायला मिळणार असल्याने बालगोपाळ मंडळी, तरुण, विद्यार्थी, महिलांसह शिवप्रेमी मध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे.
यावर्षी शिवजन्मोत्सव समिती शहरात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करीत आहे. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती तर्फे दि. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्या जवळ शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात असंख्य अबाल वृध्दांसह शिवप्रेमी व नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.
चोपडा तालुक्यातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. त्यात शहरातील प्रताप विद्या मंदिर, विवेकानंद माध्यमिक विद्यालय, पंकज ग्लोबल स्कुल, क्लारा इंग्लिश मिडीयम स्कुल, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, अमर संस्थेचे (लिटिल हार्ट), बालमोहन विद्यालय, भगिनी मंडळ शैक्षणिक संस्था, चावरा इंटरनॅशनल स्कुल, स्वर्गीय उत्तमराव पाटील आश्रम शाळा हातेड बु. सहभागी होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात 120 फूट लांब, 20 फूट उंची व 25 फूट रुंदीचा भव्य असा प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 वाजता युवक - युवतींची बाईक रॅलीची गांधी चौका पासून सुरुवात होणार आहे.

No comments:
Post a Comment