विवेकानंद विद्यालयाच्या 586 विद्यार्थ्यांनी साकारले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र . . .
विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास , कल्पकतेला चालना व व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी प्रतिवर्षी नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात.
त्यातीलच एक भाग विद्यालयातील कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी पाचवी ते आठवीच्या एकूण 586 विद्यार्थ्यांकडून 19 फेब्रुवारीला येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांकडून त्यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक स्मरणचित्र विषयांतर्गत प्रसंगचित्र रेखाटून घेतलेत यात विद्यालयातील चक्क 586 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्या चित्रांचं डिजिटल चित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल , सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, पालकवृंद यांनी केले.

No comments:
Post a Comment