अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्यास यावे रा. कॉ. शरद पवार पक्षाकडून तहसीलदार यांना निवेदन
चोपडा तालुक्यात काल बेमोसमी पाऊस पडल्यामुळे व मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे, तरी तालुक्यात मुख्य पीक मका , ज्वारी , हरभरा , केळी , दादर व गहू असे पिकं काढणीवर आलेले असतांना रात्री झालेल्या बेमोसमी गारपीटीसह पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वारा आणि वादळ झाल्यामुळे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास ह्या निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नायब तहसीलदार आर. आर. महाजन यांना निवेदन दिले.
चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना त्वरित पाच दिवसाच्या आत चोपडा तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करावेत व मेटाकुटीला आलेला शेतकरी राजाला महाराष्ट्र शासनाकडून सर्व शेतकरी बांधवांना भरीव नुकसानीची मदत मिळावी ही विनंती नायब तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व तालुक्याचे व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक नाना चव्हाण , माजी जिल्हा परिषद सदस्य डी पी साळुंखे सर , शांताराम आबा सपकाळे , तुकाराम बापू पाटील , सुनील डोंगर पाटील , विशाल गवळी , शेखर पाटील , मच्छिंद्र पाटील , दीपकवानखेडे , अमोल पाटील , माजी नगरसेवक कैलास सोनवणे , मच्छिंद्र पाटील , भाईदास पाटील , भाऊसाहेब साळुंखे , इंद्रजीत पाटील , जिल्हा सरचिटणीस लहुश धनगर , युवक शहराध्यक्ष समाधान माळी , चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment