पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न . . . .
पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले व तसेच रोटरी क्लब ऑफ चोपडा चे माजी अध्यक्ष रोटे. विलास पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते, तर दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शारदा क्लासेस चे संचालक गौरव महाले व तसेच ओम शांती सेंटर च्या मंगला दिदी उपस्थित होत्या.
ह्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात , कला क्षेत्रात , शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये , तसेच तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगीरी करुन सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांसह प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक करुन प्रोत्साहन वाढविले. ह्या सोहळ्या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणुन जी.डी.पाटील , रविराज पाटील , गिरीश देशमुख, किशोर महाजन,छगन पाटील , किरण बडगुजर , निलेश पाटील हे मंचावर उपस्थित होते.
आपल्या पाल्यांची प्रगती आणि त्यांचे यश पाहुन पालक देखील आनंदी झाले. पालक देखील विद्यार्थांचे कौतुक करण्यासाठी व पारितोषिक स्विकारन्यासाठी मंचावर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे , पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.अत्तरदे , पंकज इंग्लिश मेडीयम स्कृल चे प्राचार्य केतन माळी यांची देखील उपस्थिती लाभली.

No comments:
Post a Comment