ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/02/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन
        महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. नोबेल पुरस्कार प्राप्त, भारतरत्न डॉ. सी.वी. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक समाधान पाटील, प्रमोद पाटील, विष्णू हुसे, कांचन पाटील, शाळा समन्वयक डी. एस. पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, दिप्ती पाटील, अश्विनी पाटील,  सुचिता पाटील आणि दिपाली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
         विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांसारख्या विविध शास्त्रांतील ज्ञानावर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. उपयोजित विज्ञानावर आधारित विविध प्रतिकृतींचा समावेश देखील या विज्ञान प्रदर्शनात होता. विविध आकर्षक व माहितीपूर्ण विज्ञान प्रकल्पांच्या माध्यमाने दैनंदिन समस्यांवर उपाय या प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुचविले. रेल्वे अपघात प्रतिबंधक यंत्रणा, लेसर सुरक्षा प्रणाली, स्मार्ट पूल,  चांद्रयान 3, मेंदू, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि हृदय प्रतिकृती, हेमोडायलिसिस कार्यरत प्रतिकृती, रोबोटिक कार, वायरलेस वीज प्रेषण प्रणाली, लाइन फॉलोअर रोबोट, स्मार्ट सिटी, हसत खेळत वीज निर्मिती, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण, सूर्यमाला यांसारख्या विविध मॉडेल्सचा समावेश या विज्ञान प्रदर्शनामध्ये होता. फुलपाखराचे जीवनचक्र, वाहतुकीची साधने, संवादाचे साधन, दातांचे विविध प्रकार, बिजांकुरण, जलचक्र यासारख्या विविध विषयांवर आधारित पोस्टर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या अनुषंगाने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोख्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेली, फुले आणि फळे यांचे प्रतिनिधित्व करणारा पोशाख परिधान केला होता.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विज्ञान शिक्षिका स्वरांगी अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अर्चना जैन यांनी केले.  प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक अर्चना जैन, विशाल मराठे, वैभव मराठे, सलोणी अग्रवाल, धनश्री पवार, कल्पना बारी आणि स्वरांगी अहिरे यांचे  मार्गदर्शन लाभले. या विज्ञान प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या अनुषंगाने आकर्षक रांगोळी काढण्यात आली. रांगोळीसाठी शाळेतील शिक्षिका अश्विनी ढबू आणि पूजा चौधरी या  शिक्षकांचे सहकार्य लाभले. 
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp