चोपडा (प्रतिनिधी) : - -
गणपूरचे सुपुत्र स्वप्नील पाटील ची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड . . . .
गणपूर (ता. चोपडा) येथील सुपुत्र स्वप्नील ज्ञानेश्वर पाटील यांनी संघ लोकसेवा आयोग (यु पी एस सी ) व केंद्रीय सचिवालया मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
स्वप्नील पाटील याचे शालेय शिक्षण चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातून व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून झाले आहे . स्वप्नील हा पातोंडा (ता अमळनेर) येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक ज्ञानेश्वर काशिराम पाटील ( डी के पाटील) यांचा मुलगा आहे. सहा महिने प्रशिक्षण झाल्यावर मूळ पदावर नेमणूक होणार असल्याचे स्वप्नील पाटील यांनी S महाराष्ट्र 7 न्युजशी बोलतांना सांगितले.

No comments:
Post a Comment