Post Top Ad
Responsive Ads Here
18/03/2024
Home
Unlabelled
संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक.... प्राचार्य पालीवाल
संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक.... प्राचार्य पालीवाल
शहरातील आनंदराज पॅलेस मध्ये आयोजित या कार्यक्रमात बारा ज्येष्ठ मातृशक्तीचा सन्मानपत्र, साडी आहेर, तुळशीमाळ व गीतासार प्रदान करून सौ.शशिकला पालीवाल व स्थानिक महिला मंडळ सदस्यांचे हस्ते करण्यात आला.
त्यात श्रीमती उमाबाई पालीवाल,श्रीमती कमलाबाई पालीवाल, श्रीमती जसोदाबाई पालीवाल, श्रीमती विजयाताई पालीवाल, श्रीमती सुनीता पालीवाल, श्रीमती कमलबाई पालीवाल, श्रीमती प्रमिलाबाई पालीवाल, श्रीमती कोकिळा मगणलाल पालीवाल, श्रीमती प्रेमाबाई पालीवाल, श्रीमती भिकुबाई पालीवाल, यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये कत्थक नृत्य मध्ये समाविष्ट पालीवाल समाजातील कु. सौम्या विजय पालीवाल, कु.भाव्या हेमंत पालीवाल (मंदसौर), कु. अनन्या पालीवाल, कु. मोक्षदा कानुनगो, कु. सानवी मंडलोई (सेंधवा)यांना स्मृतिचिन्ह, पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले. ॲड.सतीश पालीवाल यांची भारत सरकारने नोटरी पदी नियुक्ती केल्याबद्दल प्रा.पालीवाल यांच्याहस्ते तसेच समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.भालचंद्र चूनिलाल पालीवाल यांना जीवन गौरव पुरस्काराने चोपडा पालीवाल समाजातर्फे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश कानुनगो यांनी आपल्या मनोगतात चोपडा पालीवाल समाजाची वाटचाल दैदिप्यमान पणे सुरू असून भविष्यातही समाजाचा नावलौकिक अधिकाधिक वाढत राहो, अश्या शब्दात शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री महेश पालीवाल,अशोक पालीवाल, संदीप पालीवाल, सौ. रुपाली पालीवाल, सौ.किरण पालीवाल, सौ. सीमा पालीवाल, आदींनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here






No comments:
Post a Comment